गोरेगाव तालुक्यात ४७ वाचनकुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2016 04:14 AM2016-04-18T04:14:22+5:302016-04-18T04:14:22+5:30
जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी शासनाने शालेय
दिलीप चव्हाण ल्ल गोरेगाव
जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी शासनाने शालेय परिसरात वाचनकुटी तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्या अनुषंगाने गोरेगाव तालुक्यात ४७ वाचनकुटी तयार करण्यात आल्या आहेत.
वाचनकुटीचा विद्यार्थी अवांतर वाचन व अभ्यास करण्यासाठी मोठ्या उत्साहाने वापर करतात. मुलांसाठी वाचन कुटीत वाचनालयातील पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतात. उन्हाळी शिबिर अंतर्गत उपक्रमासाठीदेखील वाचन कुटीचा उपयोग होत आहे. वाचन कुट्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याच्या ठरत असल्याचे तालुक्यात चित्र आहे. विशेष म्हणजे वाचनकुटीत बसल्यावर निसर्गाच्या सानिध्यात बसल्याचा आभास होतो. पूर्वीच्या काळी ज्या वाचन कुट्या पहायला मिळायच्या, हुबेहुब तशाच वाचनकुट्या शिक्षक-विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमातून तयार केल्या आहेत.
गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव केंद्रात हिरडामाली, घोटी, चंद्रपूरटोली, कटंगी, चोपा केंद्रात चोपा, तुमसर, बाम्हणी, आकोटोला, हिराटोला, तेढा, गोवारीटोला, कुऱ्हाडी केंद्रात भुताईटोला, मेंगाटोला, बागळबंद, आसलपाणी, खाडीपार, साईटोला, मोहगाव तिल्ली केंद्रात मोहगाव, तेलनखेडी, तानुटोला, गौरीटोला, पलखेडा, महाजनटोला, तिल्ली, बबई केंद्रात बबई, चिल्हाटी, आंबेतलाव, मोहाडी, मुंडीपार केंद्रात कमरगाव, मुरदोली, हेटी, जांभुळपाणी, भंडगा, पालेवाडा, कवलेवाडा केंद्रात बघोली, मरारटोला, दवडीपार केंद्रात दवडीपार, ज्योतिबानगर, बोटे, बोरीटोला, मोहगाव, सर्वाटोला, झांजीया, धुंदाटोला, नोनीटोला, गणखैरा केंद्रात गणखैरा, सिलेगाव या गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळांत सुशोभित विविधतेने नटलेल्या वाचनकुट्या तयार करण्यात आल्या आहेत.
शाळेतील शैक्षणिक वातावरणाला गती देण्यासाठी सदर उपक्रम राबविला जात आहे. यातच विद्यार्थीही शालेय वेळेपेक्षा आधी येवून या वाचनकुट्यांत बसून शिक्षणाचे धडे गिरवित असल्याचे चित्र आहे.