४७ हजार पर्यटकांनी केली जंगल सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:09 PM2018-06-04T22:09:01+5:302018-06-04T22:09:17+5:30

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशभरातील पर्यटक येतात. आता यात विदेशी पर्यटकांचीसुद्धा भर पडत आहे. एप्रिल ते जून २०१७ पर्यंत, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ पर्यंत व जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत या व्याघ्र राखीव क्षेत्राला तब्बल ४६ हजार ९३२ पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत.

47 thousand tourists made jungle safari | ४७ हजार पर्यटकांनी केली जंगल सफारी

४७ हजार पर्यटकांनी केली जंगल सफारी

Next
ठळक मुद्देआनंद पर्यटनाचा : पर्यटकांकडून २०.६६ लाखांचा महसूल जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशभरातील पर्यटक येतात. आता यात विदेशी पर्यटकांचीसुद्धा भर पडत आहे. एप्रिल ते जून २०१७ पर्यंत, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ पर्यंत व जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत या व्याघ्र राखीव क्षेत्राला तब्बल ४६ हजार ९३२ पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत.
नागझिरा अभयारण्य, न्यू नागझिरा अभयारण्य, नवेगाव अभयारण्य, नवेगावबांध राष्टÑीय उद्यान व कोका अभयारण्याचा समावेश सन २०१३ मध्ये करून नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र घोषित करण्यात आले. या क्षेत्रात पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एप्रिल १७ ते मार्च १८ पर्यंत ४६ हजार ९३२ पर्यटकांनी येथे जंगल सफारी केली आहे. यात १२ वर्षांखालील पाच हजार २८६ तर १२ वर्षांवरील ४१ हजार २५७ पर्यटकांचा समावेश आहे. तसेच एकूण ६५ विदेशी पर्यटकांचेसुद्धा येथे आगमन झाले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक पर्यटकांनी जंगल सफारी केल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यात एप्रिल ते जून २०१७ मध्ये १८ हजार ४१४ पर्यटकांनी भेटी दिल्या असून त्यांच्याकडून आठ लाख सहा हजार ५९८ रूपये, आॅक्टोबर १७ मध्ये चार हजार २४४ पर्यटकांकडून दोन लाख सहा हजार ४३५ रूपये, नोव्हेंबर १७ मध्ये दोन हजार ९९४ पर्यटकांकडून एक लाख ४० हजार ९६५ रूपये, डिसेंबर १७ मध्ये सात हजार ३६४ पर्यटकांकडून तीन लाख २१ हजार ९७० रूपये, जानेवारी १८ मध्ये पाच हजार ६५४ पर्यटकांकडून दोन लाख ५३ हजार ८८० रूपये, फेब्रुवारी १८ मध्ये तीन हजार ११० पर्यटकांकडून एक लाख ३१ हजार ८७२ रूपये व मार्च १८ मध्ये पाच हजार १५२ पर्यटकांकडून दोन लाख चार हजार ५१० रूपये अशा एकूण ४६ हजार ९३२ पर्यटकांकडून २० लाख ६६ हजार २३० रूपयांचा महसूल गोळा झाला आहे.
वाहनांव्दारे ११.१५ लाख तर कॅमेºयांतून २.५१ लाखांचा महसूल
व्याघ्र राखीव क्षेत्रात आर्थिक वर्षात पर्यटनासाठी एकूण ८९ जड तर आठ हजार ५७५ हलके अशा एकूण आठ हजार ६२८ वाहनांचा उपयोग करण्यात आला. या वाहनांसाठी ११ लाख १५ हजार ३९० रूपयांचा प्रवेश शुल्क वसूल करण्यात आला. तर पर्यटकांनी उपयोग केलेल्या दोन हजार ५४५ कॅमेºयांपोटी दोन लाख ५१ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला. पर्यटकांकडून वसूल करण्यात आलेली रक्कम, वाहनांसाठी वसूल केलेली प्रवेश शुल्काची रक्कम व कॅमेरा शुल्क असा एकूण ३५ लाख ३९ हजार ६७० रूपयांचा महसूल वन्यजीव विभागाला प्राप्त झाला आहे.

Web Title: 47 thousand tourists made jungle safari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.