दोन्ही जिल्ह्यांसाठी दिले ४७ व्हेंटिलेटर्स ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:30 AM2021-05-06T04:30:47+5:302021-05-06T04:30:47+5:30
गोंदिया : कोरोना संक्रमणाच्या या कठीण काळात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यासाठी एकूण ४७ ...
गोंदिया : कोरोना संक्रमणाच्या या कठीण काळात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यासाठी एकूण ४७ व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे रुग्णसेवेस याची मोठी मदत होणार आहे. या व्हेंटिलेटर्सचे खा. सुनील मेंढे यांच्या हस्ते विविध रुग्णालयांना वाटप करण्यात आले.
रुग्णवाहिकेशिवाय रुग्णाचे हाल होऊ नयेत, या जाणिवेतून विदर्भातील संस्थांना सुसज्ज रुग्णवाहिका भेट देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला. विदर्भातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सात स्वयंसेवी संस्थांना केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाच्या सामाजिक दायित्व निधीतून रुग्णवाहिका देण्यात आल्या. या रुग्णवाहिका संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेत राहणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला बळ मिळणार आहे. या रुग्णवाहिकेमध्ये व्हेंटिलेटर, बेड, ऑक्सिजन, असे आधुनिक तंत्रज्ञान आहे.