हजार मुलांमागे ४८ मुली कमी

By admin | Published: February 26, 2016 01:58 AM2016-02-26T01:58:26+5:302016-02-26T01:58:26+5:30

मुलगी घरची लक्ष्मी अशी समज असलेल्या आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात आता परिस्थिती बदलत आहे.

48 girls less than thousand boys decrease | हजार मुलांमागे ४८ मुली कमी

हजार मुलांमागे ४८ मुली कमी

Next

नरेश रहिले गोंदिया
मुलगी घरची लक्ष्मी अशी समज असलेल्या आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात आता परिस्थिती बदलत आहे. जिल्ह्यात प्रत्येक वर्षी मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. हीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात सामाजिक संतूलन ढासळणार आहे. आताच्या स्थितीत गोंदिया जिल्ह्यात दर हजारी पुरुषामागे मुलींची संख्या ९५२ आहे. हजार पुरूषाच्या मागे ४८ मुली कमी आहेत.
जिल्ह्यात एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१५ पर्यंत एक हजार पुरूषांमागे ९५२ मुली जन्माला आल्या आहेत.सन २००१ व २०११ च्या जनगणनेनुसार महिला १००५ तर पुरूष ९९९ होते. १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०१५ दरम्यान ७ हजार २८१ पुरूष तर ६ हजार ९३५ मुलींनी जन्म घेतला. मुलींच्या जन्मासंदर्भात सालेकसा व देवरी तालुक्यात चांगली स्थिती आहे. देवरी तालुक्यात ५६५ मुले व ५९७ मुलींनी जन्म घेतला. म्हणजेच दर हजारी मुलांमागे १०५७ मुलींनी जन्म घेतला. सालेकसा तालुक्यात ३२३ मुले व ३३९ मुलींनी जन्म घेतला. म्हणजेच दर हजारी पुरूषांमागे १०५० मुलींचा जन्म होत आहे. मुलींच्जा जन्मासंदर्भात सर्वात वाईट परिस्थिती सडक अर्जुनी तालुक्यात आहे. ४३९ मुलांमागे ३३५ मुलींंनी जन्म घेतला. येथे हजारी पुरूषांमागे मुलींचा जन्मदर ७६३ आहे. गोरेगाव तालुक्यात ३८९ मुलांमागे ३४१ मुलींनी जन्म घेतला. येथे हजारी पुरूषांमागे मुलींचा जन्मदर ८७७ आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात ५३६ मुलांमागे ४७५ मुलींनी जन्म घेतला. या तालुक्यात हजारी पुरूषांमागे ८८६ मुलींची संख्या आहग. आमगाव तालुक्यात ४२८ मुलांमागे ३८४ मुलींनी जन्म घेतला. या तालुक्यात हजारी पुरूषांमागे ८९७ मुलींचा जन्म आहे. तिरोडा तालुक्यात ५२६ मुले व ४९६ मुलींनी जन्म घेतला. या तालुक्यात हजारी पुरूषांमागे ९४३ आहे. गोंदिया तालुक्यात ४ हजार ७५ मुले तर ३ हजार ९६८ मुलींनी जन्म घेतला. गोंदिया तालुक्याच्या हजारी पुरूषांमागे ९७४ मुलींचा जन्मदर आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करा अशी जनजागृती समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींकडून होत असली तरी जिल्ह्यातील परिस्थीती पाहिजे त्या प्रमाणात चांगली नाही. लींग चाचणीवर शासनाने कडक निर्बंध घातले तरी ज्या वस्तूला बंदी त्याची तेवढीच अधिक किंमत असते. लींग चाचणीवर निर्बंध असले तरी ८० हजारात हे कृत्य केले जात असल्याची चर्चा सद्या ऐकीवात आहे.

Web Title: 48 girls less than thousand boys decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.