चौथीत गेलेले विद्यार्थी तिसरीच्या मुल्यमापन चाचणीत नापास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 04:14 PM2024-07-06T16:14:06+5:302024-07-06T16:15:14+5:30

पायाभूत चाचणीचे आयोजन : गोंदिया जिल्ह्यात १० ते १४ जुलैदरम्यान घेणार चाचणी

4th class students failed in 3rd assessment test | चौथीत गेलेले विद्यार्थी तिसरीच्या मुल्यमापन चाचणीत नापास

4th class students failed in 3rd assessment test

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यास अनुसरून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-१ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे.


नियतकालिक मूल्यांकन चाचणींतर्गत पायाभूत चाचणी दि. १० ते १४ जुलै २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अध्यायनस्तर समोर येणार आहे. या चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे. यासाठी डायट आणि शिक्षण विभागाने तयारी केली आहे.


कोणाची घेणार?
प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व संस्थांच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.


कधी घेणार?
नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी १० ते १४ जुलै २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.


काय आहे पायाभूत चाचणी?
तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-१ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे.


विविध माध्यमांत होणार चाचणी
या चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत. विविध माध्यमांत चाचणी होणार आहे.


इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन
नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर समजणार आहे. ही चाचणी पारदर्शक होणार आहे. त्यामुळे या चाचणीतून विद्यार्थ्यांची वास्तविक स्थिती समजणार आहे. यासाठी डायट आणि शिक्षण विभागाने तयारी केली आहे.
- सुधीर महामुनी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, गोंदिया

Web Title: 4th class students failed in 3rd assessment test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.