अध्यक्षपदासाठी ५ तर सदस्यांसाठी ५५ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:21 AM2017-12-02T00:21:20+5:302017-12-02T00:21:30+5:30

येत्या १३ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगर पंचायतच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ५ तर १७ वॉर्डातील १७ सदस्य पदासाठी एकूण ५९ उमेदवार मैदानात उतरले आहेत.

5 candidates for the presidency and 55 for the candidates in the fray | अध्यक्षपदासाठी ५ तर सदस्यांसाठी ५५ उमेदवार रिंगणात

अध्यक्षपदासाठी ५ तर सदस्यांसाठी ५५ उमेदवार रिंगणात

Next
ठळक मुद्देनगर पंचायत निवडणूक : अध्यक्षपदासाठी भाजप-काँग्रेसमध्ये बंडखोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : येत्या १३ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगर पंचायतच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ५ तर १७ वॉर्डातील १७ सदस्य पदासाठी एकूण ५९ उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रथम नगराध्यक्ष बनण्याचा बहुमन येथे अनुसूचित जमातीला मिळणार असून यासाठी भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत. शिवाय दोन्ही पक्षाचे बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यामुळे हे बंडखोर कोणाचे गणित बिघडवतात हे बघावे लागेल. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी हलबीटोला येथील किशोर गावराने यांना उमेदवारी दिली आहे. परंतु भाजपचेच विरेंद्र उईके सुरुवातीपासून प्रबळ दावेदार होते व शेवटी पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत टोपली हातात घेतली आहे.
काँग्रेसनेही हलबीटोला येथील श्यामकला सुभाष प्रधान या महिला उमेदवाराला हात देऊन मतांचे गणित साधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु काँगे्रेसच्या सुनंदा मनोहर उईके बंडखोरी करीत टेबल निवडणूक चिन्ह घेऊन मैदानात उतरल्या आहेत. राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने जांभळी येथील विनोद मडावी यांना उमेदवारी देऊन भाजप आणि काँग्रेसमध्ये मत विभाजन होऊन आपल्याला लाभ मिळेल अशा अपेक्षेत आहे.
सालेकसा नगर पंचायतीत एकूण ५ गावांचा समावेश असून नगर पंचायत पूर्णपणे ग्रामीण परिसरात आहे. यात मुरुटोलाटोला मुख्य मार्गावर असून बाकलसर्रा, जांभळी, सालेकसा(जुना) हलबीटोला ही गावे जंगल परिसरात व तालुका मुख्यालयापासून दूर आहेत.
यात बाकलसर्रा आणि सालेकसा येथे प्रत्येकी २ प्रभाग आहेत. तर मुरुमटोला आणि जांभळी मध्ये प्रत्येकी ३ प्रभाग आहेत. परंतु हलबीटोला येथे एकूण ७ प्रभागांचा समावेश असून जवळपास निम्मे मत या एकाच गावी आहेत. त्यामुळे मतांचे गणित समोर ठेवून भाजप आणि काँग्रेसने आपले उमेदवार याच गावातून दिले आहे. तर अपक्ष लढणारे विरेंद्र उईके हे बाकलसर्रा, सुनंदा उईके या सालेकसा आणि राकाचे उमेदवार जांभळी येथे वास्तव्यात आहेत. त्यामुळे स्वत:च्या गावासह दुसºया गावी किती मते खेचून आणतील हे पाहावे लागेल. शिवसेनेने ऐनवेळी आपला उमेदवार मागे घेतला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी कोणाला मदत करतील हे बघायचे आहे.
नगरसेवक पदासाठी काँग्रेसने सर्व १७ प्रभागांत आपले अधिकृत उमेदवार उतरविले आहेत. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातून नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा मते मिळतील अशी अपेक्षा ते करीत आहेत. तर भाजपने १७ पैकी १४ प्रभागात उमेदवार उभे केले असून प्रभाग क्रं. १, ६ आणि ८ मध्ये त्यांना उमेदवार मिळाला नाही. तरी या प्रभागातून नगराध्यक्ष पदासाठी मते खेचण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. काँग्रेस भाजप पाठोपाठ राष्टÑवादी काँग्रेसने ८ प्रभागात, शिवसेनेने ७ प्रभागात तर मनसेने १ प्रभागात आपला उमेदवार उभा केला आहे. तसेच टोपली चिन्हावर लढणारे १० आणि जग चिन्हावर लढणारे २ उमेदवार मैदानात आहेत.
प्रभाग निहाय उमेदवारांची संख्या बघितली तर प्रभाग क्रमांक १, ६, १५ आणि १६ मध्ये प्रत्येकी फक्त २ उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रभाग क्र.१ आणि ६ मध्ये भाजपचा उमेदवार नसून बंडखोर उभे आहेत. प्रभाग क्रमांक २, ३,४,५,८,१२,१४ आणि १७ मध्ये प्रत्येकी ४ उमेदवार मैदानात आहेत. प्रभाग क्रमांक ७,९ आणि १३ मध्ये प्रत्येकी ३ तर प्रभाग क्रमांक १० आणि ११ मध्ये प्रत्येकी ५ उमेदवार मैदानात आहेत. या दोन्ही वॉर्डामध्ये काही दिग्गज नेते व कार्यकर्ते आपले नशिब आजमावत आहेत. त्यामुळे सर्वांची नजर या प्रभागात जास्त राहणार आहे. तसेच मतांचे विभाजन अधिक होऊन फार कमी फरकाने जय-पराजय होण्याची दाट शक्यता आहे.
ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार नाहीत त्या ठिकाणी अपक्ष उभे असलेले उमेदवार काँग़्रेससोबत सामना करताना दिसतील. परंतु जर निवडून आले तर कोणाच्या गोट्यात जाऊस बसतील सांगणे कठिण आहे. प्रमुख पक्षांनी आपापले प्रचार कार्यालय सुरु करुन प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. कोणाचा नगराध्यक्ष बनेल व कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल हे मतगणनेनंतरच कळेल.

Web Title: 5 candidates for the presidency and 55 for the candidates in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.