दोघा मोटारसायकल चोरट्यांकडून ५ मोटारसायकली केल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 10:55 PM2022-11-04T22:55:21+5:302022-11-04T22:56:35+5:30

गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ग्रामीण व रावणवाडी परिसरात गुन्हे प्रतिबंधासाठी पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना विनायक नेवारे (रा.गिरोला) याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली आहे व तो दासगाव-किन्ही परिसरात फिरत आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. यावर पथकाने नेवारेचा शोध घेऊन त्याला दासगाव-किन्ही परिसरातून ताब्यात घेतले.

5 motorcycles seized from two motorcycle thieves | दोघा मोटारसायकल चोरट्यांकडून ५ मोटारसायकली केल्या जप्त

दोघा मोटारसायकल चोरट्यांकडून ५ मोटारसायकली केल्या जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  वेगवेगळ्या ठिकाणांहून मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांकडून ५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या जप्त करण्यात आलेल्या माेटारसायकलींची किंमत अडीच लाख रुपये सांगितली जाते. ही कारवाई  गुरुवारी (दि.३) स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. 
गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ग्रामीण व रावणवाडी परिसरात गुन्हे प्रतिबंधासाठी पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना विनायक नेवारे (रा.गिरोला) याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली आहे व तो दासगाव-किन्ही परिसरात फिरत आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. यावर पथकाने नेवारेचा शोध घेऊन त्याला दासगाव-किन्ही परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर, त्याने नवेगाव, किरणापूर, लांजी (बालाघाट) येथून सर्व मोटारसायकली चोरून आणल्याचे सांगितले. त्याला एक विधीसंघर्षित बालक चोरीसाठी मदत करीत होता, तसेच रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या निर्देशांन्वये पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, पोलीस नायक महेश मेहर, पोलीस शिपाई संतोष केदार,  विजय मानकर, चालक पोलीस शिपाई पांडे यांनी केली आहे.

या मोटारसायकली केल्या जप्त
- आरोपींनी लांजी  व रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले असून, त्यांच्याकडून  एमपी ५०- एमव्ही ८८१० क्रमांकांची मोटारसायकल किंमत ४० हजार रुपये,  यूके ०५-बी ४३९२ क्रमांकाची मोटारसायकल किंमत ७० हजार रुपये, एमपी ५०-एमपी ७२१२, एमपी ५०-एमआर ५८७९ क्रमांकाची मोटारसायकल किंमत ७० हजार रुपये, विना क्रमांकाची एक मोटारसायकल किंमत ७० हजार हा माल जप्त केला आहे.

 

Web Title: 5 motorcycles seized from two motorcycle thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर