५ हजार विद्यार्थिनींना मिळणार सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 10:01 PM2017-12-06T22:01:18+5:302017-12-06T22:01:47+5:30

शासनाच्या मानव विकास कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील ५ हजार ३२८ विद्यार्थिनींना शंभर टक्के अनुदानावर सायकल वाटप करण्यात येणार आहे.

5 thousand students will get the ride | ५ हजार विद्यार्थिनींना मिळणार सायकल

५ हजार विद्यार्थिनींना मिळणार सायकल

Next
ठळक मुद्देमानव विकास कार्यक्रम : एक कोटी ६० लाखाची तरतूद

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : शासनाच्या मानव विकास कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील ५ हजार ३२८ विद्यार्थिनींना शंभर टक्के अनुदानावर सायकल वाटप करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तयार केली असून लवकरच सायकलचे वाटप केले जाणार आहे.
ज्या विद्यार्थिनीच्या घरांपासून शाळेचे अंतर ३ कि.मी. किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्या विद्यार्थिनीना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत शंभर टक्के अनुदानावर सायकल देण्याची योजना सुरु केली आहे. गावापासून शाळेचे अंतर दूर आहे म्हणून मुली शिक्षण सोडू नये, यासाठी सुरु केलेल्या या योजनेचा लाभ सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील ५ हजार ३२८ विद्यार्थिनींना मिळणार आहे. एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांच्या शैक्षणिक मार्गातील अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. यासाठी इयत्ता ८ ते १२ वीच्या गरजू विद्यार्थिनीना सायकल वाटप करण्याकरिता मानव विकास कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यासाठी एक कोटी ५९ लाख ८४ हजार रुपयांचा निधी माध्यमिक शिक्षणाधिकारी गोंदिया यांना देण्यात आला आहे. गोंदिया, तिरोडा, आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव, सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव या आठही तालुक्यातील प्रत्येकी ६६६ विद्यार्थिनींना सायकलचा लाभ देण्यात येणार आहे.
त्यासाठी प्रत्येक तालुक्याला १९ लाख ९८ हजार रुपये असे एक कोटी ५९ लाख ८४ हजार रुपये शिक्षणाधिकाºयांना देण्यात आले आहे. ही रक्कम तालुका निहाय वाटप करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाºयांनी दिली.
मानव विकाससाठी १३ कोटी ९० लाख
मानव विकास कार्यक्रमांतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी जिल्हा मानव विकास समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी १३ कोटी ६२ लाख ५६ हजार रुपये मंजूर केले आहे. यामध्ये २७ लाख १२ हजार अनुसूचित जातीच्या उपाय योजनेसाठी मंजूर करण्यात आले आहे. एकूण १३ कोटी ८९ लाख ६८ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे.

Web Title: 5 thousand students will get the ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.