पहिली ते नववी ५० टक्के तर दहावी बारावीच्या शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:20 AM2021-06-19T04:20:20+5:302021-06-19T04:20:20+5:30
.................. संचालकांचे पत्र काय शिक्षण संचालकांनी पत्र काढून २८ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहे. नवीन ...
..................
संचालकांचे पत्र काय
शिक्षण संचालकांनी पत्र काढून २८ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहे. नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात ही ऑनलाईन पध्दतीनेच करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच उजळणी घेवून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम सुरु करावा, इयत्ता पहिली ते नववीच्या शिक्षकांची ५० टक्के तर दहावी ते बारावीच्या शिक्षकांची शंभर टक्के उपस्थित राहण्याची सूचना केली आहे.
...................
जि.प.पत्र काय
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सुध्दा शिक्षण संचालकांच्या पत्राचा आधार घेत इयत्ता पहिली ते नववीच्या शिक्षकांची ५० टक्के तर दहावी ते बारावीच्या शिक्षकांची शंभर टक्के उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. तसेच शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सवाने सुरु करण्याच्या सूूचना केल्या आहेत. ऑनलाइन वर्ग सुरु होणार असले तरी विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी शिक्षणाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
.................
काय म्हणतात शिक्षक
ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणात बऱ्याच अडचणी येतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाकडे ॲन्ड्राईड मोबाईल नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाइन ऐवजी कोरोना नियमांचे पालन करुन प्रत्यक्षात शाळा सुरु केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
- किशोर डोंगरवार, शिक्षक.
...........
शिक्षण संचालकांनी २८ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिर्वाय करण्यात आली आहे. ऑनलाइन पध्दतीने शिकवणी वर्ग सुरु केले जाणार असून यासाठीची पूर्व तयारी करण्याचे निर्देश दिले असून त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे.
- रवि अंबुले, शिक्षक.
......................
कोट :
इयत्ता पहिली ते नववी आणि दहावी ते बारावीच्या नवीन शैक्षणिक सत्राला २८ जूनपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांना सुध्दा सूचना करण्यात आल्या आहेत.
- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी
...................
शिक्षक : ८८००
शिक्षकेत्तर कर्मचारी : ३४२५
.................
जिल्ह्यातील शाळा : १६१९
जि.प.शाळा : १०४९
अनुदानीत शाळा : ३४५
विना अनुदानीत शाळा : २४५
.....................