कृषी विभागाचे ५० बंधारे भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 09:40 PM2017-12-25T21:40:51+5:302017-12-25T21:41:14+5:30

आमगाव तालुक्यातील कृषी विभागामार्फत असलेले ५० पेक्षा अधिक बंधारे भग्नावस्थेत असल्यामुळे ओढे, नदी, नाले यांचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. फक्त पैसे कमविण्याच्या नादात कृषी विभाग बोगस बंधाऱ्यांचे बांधकाम करते.

50 bunds of agriculture department are under suspension | कृषी विभागाचे ५० बंधारे भग्नावस्थेत

कृषी विभागाचे ५० बंधारे भग्नावस्थेत

Next
ठळक मुद्देआमगाव तालुक्यातील प्रकार : जलयुक्त शिवार नावापुरतेच

लोकमत न्यूज नेटवर्क
चिरचाळबांध : आमगाव तालुक्यातील कृषी विभागामार्फत असलेले ५० पेक्षा अधिक बंधारे भग्नावस्थेत असल्यामुळे ओढे, नदी, नाले यांचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. फक्त पैसे कमविण्याच्या नादात कृषी विभाग बोगस बंधाऱ्यांचे बांधकाम करते. गरज आहे त्या ठिकाणी बंधाºयांचे बांधकाम केले जात नाही. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला कृषी विभागच तिलांजली देत आहे.
महाराष्टÑ शासनाने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केला. पाणी अडवा, पाणी जिरवा या मोहीमेतून जमीनीची पाण्याची पातळी वाढेल या हेतूने वनराई बंधारे बांधावे, नदी, ओढे, नाले यावर बंधाऱ्याची निर्मीती करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. परंतु आमगाव तालुक्याच्या कृषी विभाग जलयुक्त शिवार अभियानाला डावलत आहे. तालुक्यात कृषी विभागांर्गत नदी, ओढे, नाले या ठिकाणी सन १९९९ ते २००० मध्ये तयार करण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची आजघडीला दुरावस्था आहे. ज्यावेळी हे बंधारे तयार करण्यात आले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षातच ह्या बंधाºयांची हालत खस्ता झाली. ठिकठिकाणातून हे बंधारे फुटले. बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे बंधारे तयार करण्यात आल्यामुळे पावसाच्या पाण्याने ते बंधारे वाहून गेले. त्यामुळे जंगलातून वाहून जाणारे पाणी नाले, ओढ्यातून वाहतांना या बंधाऱ्यांच्या माध्यमातून अडकविले जाऊ शकते. परंतु १७ वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या बंधाऱ्यांची साधी दुरूस्तीही न झाल्यामुळे हे बंधारे वाहून गेले. परिणामी आता पावसाचे पाणी अडून राहात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी अपुरे पडते. कधी पूर तर कधी अवर्षण यामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट होत आहे. परंतु अवर्षणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवाराचाही लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळत नसल्याची खंत शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.
नदी, ओढे, नाले या ठिकाणी सिमेंट बंधारे बांधण्यात यावे किंवा जून्या बंधाºयांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
म्हणे, फक्त पाचच गावात होईल काम
आमगाव तालुक्यात ६८ गावे आहेत. परंतु यापैकी फक्त पाचच गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली. ज्या गावांची निवड या अभियानात करण्यात आली त्याच गावात सिमेंट बंधाºयांचे काम करण्यात येईल. अन्यथा इतर गावांतील शेतकºयांना सिंचनासाठी कसलीही सोय आम्ही करू शकणार नाही असे कृषी अधिकाºयांचे म्हणणे आहे. अंजोरा सर्कल मधील बंधाºयांचे काम करण्यासाठी जि.प.सदस्य जियालाल पंधरे यांनी कृषी विभाग, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग यांच्या कार्यालयाच्या चकरा मारल्या परंतु त्यांना या बंधाºयासंदर्भात कसलीही मदत मिळाली नाही. हे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवित आहेत.

या सिमेंट बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी कृषी विभाग व लघु पाटबंधारे विभाग जि. प. कार्यालया आमगाव यांच्या अनेकदा चकरा मारल्या परंतु येथील अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी झटकली. शेतकऱ्यांसाठी वरदान म्हणून शासन जलयुक्त शिवार अभियानाचा गवगवा करते. परंतु शेतकऱ्यांना गरज असलेल्या ठिकाणी बंधाºयांची निर्मीती किंवा दुरूस्ती होत नसल्याने या अभियानाचा काय उपयोग.
-जियालाल पंधरे
जि.प.सदस्य अंजोरा क्षेत्र

Web Title: 50 bunds of agriculture department are under suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.