५० शेतकऱ्यांचा धान करपला

By admin | Published: May 23, 2017 12:54 AM2017-05-23T00:54:21+5:302017-05-23T00:54:21+5:30

तालुक्यातील पुरगाव येथील शेतकऱ्यांनी कटंगी मध्यम प्रकल्पातील पाण्यासाठी डिमांड भरून रब्बी धानाची लागवड केली. प्रकल्पाच्या पाण्यावर धानपिक चांगले फुलले.

50 farmers crushed the paddy | ५० शेतकऱ्यांचा धान करपला

५० शेतकऱ्यांचा धान करपला

Next

पूरगाव येथील प्रकार: अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील पुरगाव येथील शेतकऱ्यांनी कटंगी मध्यम प्रकल्पातील पाण्यासाठी डिमांड भरून रब्बी धानाची लागवड केली. प्रकल्पाच्या पाण्यावर धानपिक चांगले फुलले. परंतु पंधरा दिवसापासून कटंगी मध्यम प्रकल्पाचे पाणी न मिळाल्यामुळे पुरगावच्या ५० शेतकऱ्याचे धान पिक पूर्णत: मेले. या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अधिकाऱ्यांच्या पगारातून द्यावी अशी मागणी एकरी २० हजार रुपये भाजपा युवा मोर्चा अनंता ठाकरे यांनी केली आहे.
पुरगाव येथील शेतकऱ्यांना यावर्षी रबी पिकाला कटंगी प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाणी देऊ तुम्ही डिमांड भरा असे सांगून डिमांड भण्यास शेतकऱ्यांना बाध्य केले.
शेतकऱ्यांनी धान पिक लावले धानाचे पिक लोंब येईपर्यंत चांगले आले.पण धान गर्भात असताना अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसापासून पूरगावचे पाणी बंद करून पांगोली नाल्यात पाणी सोडले.
अनेक वेळा पाण्याची मागणी करुनही पुरगावच्या शेतकऱ्यांना पाणी न दिल्यामुळे धान पिकाचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी व अनंता ठाकरे व इतर शेतकऱ्यांनी केला आहे.

Web Title: 50 farmers crushed the paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.