शालिमार एक्स्प्रेसमध्ये पकडली ५० किलो चांदी, रेल्वे सुरक्षा बलची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 11:47 AM2023-11-03T11:47:37+5:302023-11-03T11:47:55+5:30

प्रवाशाला राजनांदगाव येथे पकडले

50 kg silver seized in Shalimar Express, action of Railway Security Force | शालिमार एक्स्प्रेसमध्ये पकडली ५० किलो चांदी, रेल्वे सुरक्षा बलची कारवाई

शालिमार एक्स्प्रेसमध्ये पकडली ५० किलो चांदी, रेल्वे सुरक्षा बलची कारवाई

नरेश रहिले

गोंदिया : ट्रेन क्रमांक १८०२९ शालीमार एक्स्प्रेसमध्ये पकडलेल्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात ५०.३५५ किलो चांदी, किंमत २१ लाख ४० हजार ८७ रुपये अवैधरित्या तस्करी करताना गोंदियाच्यारेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी २ नोव्हेंबर रोजी पकडले.

आगामी विधानसभा निवडणुका पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग (छत्तीसगड, मध्य प्रदेश राज्य) यांनी छत्तीसगड, मध्य प्रदेशाच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान क्राईम इंटेलिजन्स ब्रँच, गोंदिया, नागपूर आणि टास्क टीमच्या फोर्स सदस्यांद्वारे ट्रेन क्रमांक १८०२९ शालीमार एक्स्प्रेसमध्ये सखोल तपासणी केली. प्रदेश राज्य). एस_६ मध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्यावर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे सुमारे ५० किलो वजनाची चांदीची विविध प्रकारची छोटी भांडी आढळून आली आणि त्याच्याकडे असलेल्या बिलाच्या कागदपत्रात संशयास्पदता आढळून आली.

सदर गाडी राजनांदगाव रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर उपरोक्त व्यक्तीला त्याच्या सामानासह तेथे टाकण्यात आले आणि सहायक आयुक्त राज्य कर विभागासह निवडणूक नोडल अधिकारी (GST) राजनांदगाव छत्तीसगड यांच्यासमोर हजर करण्यात आले. वरील दोन्ही प्रवाशांच्या बॅगची तपासणी केली असता चांदीच्या धातूच्या मूर्ती, लहान-मोठे ताट, भांडी, काच, दिवे इत्यादी कागदी बंडलमध्ये गुंडाळलेले, पॉलिथीनमध्ये मिक्स केलेली भांडी व चांदीची पायल अशी ३ निळ्या रंगाची पॉलिथिनची पाकिटे आढळून आली.

ही कारवाई दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर, आरपीएफचे महानिरीक्षक प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त मुनव्वर खुर्शीद आणि दीप चंद्र आर्य, विभागीय सुरक्षा आयुक्त/ रेल्वे संरक्षण दल, दक्षिण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे गुप्तचर शाखा गोंदियाचे प्रभारी निरीक्षक अनिल पाटील, निरीक्षक प्रशांत आलडक, उपनिरीक्षक के. के. दुबे, उपनिरीक्षक विनेक मेश्राम, सौनी एस.एस.ढोके, कॉन्स्टेबल नासीर खान आणि मंडळ टास्क टीमचे हेड कॉन्स्टेबल पी. दलाई, कॉन्स्टेबल आर. एन. पेशणे, कॉन्स्टेबल प्रमोद कुमार, आरपीएफ पोस्ट राजनांदगाव, सहायक उपनिरीक्षक इर्शाद अली यांचा सहभाग हाेता.

Web Title: 50 kg silver seized in Shalimar Express, action of Railway Security Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.