खूनाचा प्रयत्न करणाऱ्या ५३ जणांवर गुन्हा दाखल

By admin | Published: September 22, 2016 12:39 AM2016-09-22T00:39:56+5:302016-09-22T00:39:56+5:30

ट्रकमध्ये जनावरे डांबून त्यांना कत्तलखान्यात नेणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर चंगेरा येथील ५३ जणांनी दगडफेक केली.

53 accused have attempted murder | खूनाचा प्रयत्न करणाऱ्या ५३ जणांवर गुन्हा दाखल

खूनाचा प्रयत्न करणाऱ्या ५३ जणांवर गुन्हा दाखल

Next

शासकीय अडथळ्यात एमसीआर : खुनाच्या प्रयत्नात १२ जणांना अटक
गोंदिया : ट्रकमध्ये जनावरे डांबून त्यांना कत्तलखान्यात नेणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर चंगेरा येथील ५३ जणांनी दगडफेक केली. त्या लोकांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगळवारच्या पहाटे ३ वाजता कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांना पकडण्यासाठी गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते आपल्या स्टॉप व रावणवाडी पोलिसांना घेऊन कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर चंगेरा येथील ५३ लोकांनी दगड, काठ्या, राड, तलवार व चाकू घेऊन हल्ला चढविला. पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. पोलिसांना माहिती पुरविता म्हणून बाबू नावाच्या इसमाच्या घरावर हल्ला चढजवण्यात आला. यात बाबूची आई मकबुलबी रफीक खान (५२) रा. चंगेरा यांना राडने मारून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्यात उपविभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचारी माधव केंद्रे, संदीप बल्लारी व रावणवाडीचे माधव केंद्रे हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणात आरोपी इमरान रहिमान शेख, मो. वसीम नाजर खान, राजीक जलील खान, खलील रशीद खान, मोहीम सलीम खान, इरशाद मीसार खान,आबीद हिदायत खान, सुभान सलाम खान, मुस्ताक राज खान, जलील रसीद खान, आशिफ रसीद खान, वसीम सलीम, मुनीर रसीन खान व इतर ४० लोकांवर कलम ३०७, ३५४, २९४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात १२ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने एमसीआर दिला. परंतु पुन्हा ३०७ या कलमांतर्गत आरोपींना ताब्यात घेतले. (तालुका प्रतिनिधी)

१२ जणांनी फोडले वाहन
या प्रकरणात बोलिसांच्या एमएच ३५ डी १९१ या वाहनावर दगडफेक करून वाहनाचे २० हजाराचे नुकसान केले. या प्रकरणातील १२ आरोपींवर भादंविच्या कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४८,१४९, ४२७, सहकलम ११ (१) (ड), प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा कलम ५ (अ), ५ (ब), ६, ९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 53 accused have attempted murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.