५३१ दुर्गा मूर्र्तींची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 10:19 PM2017-09-21T22:19:52+5:302017-09-21T22:20:08+5:30
जगत जननी देवी दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना गुरूवारी जिल्हाभरात उत्साह आणि आनंदपूर्ण वातावरणात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जगत जननी देवी दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना गुरूवारी जिल्हाभरात उत्साह आणि आनंदपूर्ण वातावरणात करण्यात आली. मागील वर्षी जिल्ह्यात ५३८ ठिकाणी दुर्गा मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. यावर्षी ५३१ मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. भाविकांनी दुपारपासूनच मूर्तिकारांजवळून मूर्ती ढोलताशांच्या गजरात नेऊन स्थापना केली.
गोंदिया जिल्ह्यात मोठ्या भक्तीभावाने दुर्गोत्सव साजरा केला जातो. नवरात्रीदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सार्वजनिक दुर्गा उत्सवात गरबा, दांडीया, नृत्य, जागरण व विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आज गुरूवारी ढोल ताशांच्या गजरात दुर्गा मूर्ती स्थापन करण्यात आल्या. त्या गोंदिया शहर पोलिस ठाण्यांतर्गत ४० दुर्गा स्थापन करण्यात आल्या. २१ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत २१ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. २१ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत ५५ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ५० ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ५५ दुर्गा स्थापन करण्यात आली. ३० ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे.
तिरोडा पोलिस ठाण्यांतर्गत ३९ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. २९ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत ३५ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. १८ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ३० दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ४ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत ७० दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ३५ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत ४९ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ४१ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ६९ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ४९ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे.
देवरी पोलिस ठाण्यांतर्गत ९ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ५५ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. चिचगड पोलिस ठाण्यांतर्गत ५ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ३५ ठिकाणी शारदा मूर्तीची स्थापन केली जाणार आहे. डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत १५ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ६४ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. अर्जुनी-मोरगाव पोलिस ठाण्यांतर्गत २५ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. ४५ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. नवेगावबांध पोलिस ठाण्यांतर्गत ५ दुर्गा स्थापन करण्यात आल्या. २४ ठिकाणी शारदा मूर्ती स्थापन केली जाणार आहे. केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत ७ दुर्गा मूर्तीची स्थापन करण्यात आल्या.
१९४ ठिकाणी रावणदहन
नवरात्रौत्सवाच्या अखेर रावनदहन केले जाते. गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षी १९० ठिकाणी रावणदहन करण्यात आले होते. तर यंदा १९४ ठिकाणी रावणदहन केले जाणार आहे. त्यात गोंदिया शहर ५, रामनगर २, गोंदिया ग्रामीण ४२, रावणवाडी ७, तिरोडा २, गंगाझरी १०, दवनीवाडा ५, आमगाव १९, गोरेगाव ७, सालेकसा ३, देवरी २, चिचगड ४, डुग्गीपार ५५, अर्जुनी-मोरगाव ३, नवेगावबांध २, केशोरी २६ रावण दहन केले जाणार आहे.
२७५ होमगार्ड मागविले
दुर्गोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस बंदोबस्त करणार आहेत. ३ दंगल नियंत्रक पथक नियंत्रण कक्षात ठेवण्यात येणार आहेत. गरज भासल्यास त्या ठिकाणी या पथकांना पाठविता येणार आहे. या ३ पथकांत ३ अधिकारी व ३७ कर्मचाºयांचा समावेश आहे. ४ उपविभागीय अधिकाºयांकडे प्रत्येकी १ ट्रॅकींग फोर्स, पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रत्येकी १ ट्रॅकींग फोर्स असे ६ फोर्स तयार करण्यात आले आहेत. त्यात ६ अधिकारी व ५० कर्मचाºयांचा समावेश आहे. ३ पथक पोलीस मुख्यालयात ठेवण्यात येणार आहेत. त्यात दोन सी-६० चे पथक राहणार आहेत. शिवाय बॉम्बशोध, नाशक पथकही नेमण्यात आले आहेत.
या गोष्टीची घ्यावी लागणार काळजी
मूूर्तीच्या सुरक्षिततेसाठी उत्सव मंडळ व ग्राम सुरक्षा दल नेहमी प्रमाणे पुढाकार घेणार आहे. मूर्ती मांडलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी पडणार नाही, मूर्तीच्या सुरक्षेसाठी संपूर्ण जबाबदारी मंडळाच्या सदस्यांची राहील. जनावरे मंडपात येणार नाही याची काळजी घ्यावी. अश्या सूचना पोलिस विभागाकडून करण्यात आल्या आहे.