५६० प्रवाशांना परत केली बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 09:47 PM2018-04-08T21:47:13+5:302018-04-08T21:47:13+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागाद्वारे एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत १२ महिन्यांच्या कालावधीत ५६० बॅग व किंमती सामान संबंधित व्यक्तींना सोपविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागाद्वारे एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत १२ महिन्यांच्या कालावधीत ५६० बॅग व किंमती सामान संबंधित व्यक्तींना सोपविण्यात आले आहे. प्रवाशांना फोनद्वारे सूचना देवून त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीवर बोलविण्यात आले. कायदेशीररित्या सामान व बॅगची ओळख पटवून ५६० बॅग त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या.
रेल्वेमध्ये सर्वाधिक माल वाहतूक होते. शिवाय एक कोटी २० लाखांच्या जवळपास प्रवासी दररोज प्रवास करतात. तसेच दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या तिन्ही मंडळाद्वारे प्रवासी सुविधांवरही लक्ष दिले जात आहे. दपूम रेल्वेच्या तिन्ही मंडळांतर्गत ३१६ स्थानकांवर दिवसरात्र प्रवासी सुविधा प्रदान करीत ३५५ प्रवासी गाड्यांचे परिचालन दरदिवशी केले जात आहे. एवढ्या मोठ्या संख्येत लोक सुरक्षितपणे आपल्या गंतव्यापर्यंत रेल्वेद्वारे पोहोचविले जात आहेत. एखाद्या विषम परिस्थितीत प्रवाशांची टिष्ट्वट व एसएमएस तसेच हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार मिळते. त्यावर त्वरित कार्यवाही करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे झोन अंतर्गत येणाºया स्थानकांत प्रवाशांद्वारे घाईगडबडीत बॅग सुटून जातात. त्यात रोख रकमेसह लॅपटॉप, किंमती दागिने, महागड्या वस्तू व प्रवाशांचे किंमती सामान असतात. याची सूचना संबंधित प्रवाशांकडून रेल्वेच्या सुरक्षा विभागाला दिली जाते. त्यानंतर प्रवाशांच्या सामानाचा शोध घेतला जातो. बॅग किंवा सामान मिळताच त्वरित या मंडळातील रेल्वे सुरक्षा दलाद्वारे कार्यवाही केली जाते. त्यात सामानांच्या मालकांचा शोध घेवून त्यांचा पत्ता लावला जातो. सामानांची ओळख पटवून त्यांचे सामान व साहित्य त्यांच्या ताब्यात दिले जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाबद्दल विश्वास वाढला आहे.
याच दृष्टीने दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागाद्वारे एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत १२ महिन्यांच्या कालावधीत ५६० बॅग व किंमती सामान संबंधित व्यक्तींना सोपविण्यात आले आहे. प्रवाशांना फोनद्वारे सूचना देवून त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीवर बोलावून बॅगची ओळख पटवून त्यांना देण्यात आल्या.
वर्षभरात ३१० बालकांना केले पालकांच्या स्वाधीन
काही कारणांमुळे दपूम रेल्वे स्थानकांमध्ये आपल्या कुटुंबीयांपासून दुरावलेले किंवा कौटुंबीक कारणांमुळे कुटुंबाला माहिती न करताच घरून निघून गेलेली अल्पवयीन मुले रेल्वे स्थानक व रेल्वे परिसरात आढळली. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या आर्थिक वर्षभरात अशा ३१० अल्पयीन बालकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
तक्रार मिळताच केली जाते त्वरित कार्यवाही
या सर्व सामाजिक कार्यांना योग्यरित्या करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलने सीसीटीव्ही कॅमेºयांच्या संख्येत वाढ केली आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाला २४ तास नजर ठेवण्यास मदत होत आहे. त्याद्वारे संशयीतांची तपासणी केली जात आहे. आरपीएफ टिष्ट्वटर हँडल अकाऊंटसुद्धा प्रवाशांच्या सुविधांसाठी देण्यात आले आहे. तसेच प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आहे. त्यावर प्रवाशांची तक्रार मिळताच रेल्वे सुरक्षा दलद्वारे त्वरित कार्यवाही केली जात असल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले आहे.