जिल्ह्यात ५.९६ लाख मजुरांची नोंदणी!

By admin | Published: December 10, 2015 01:59 AM2015-12-10T01:59:42+5:302015-12-10T01:59:42+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजूरांचे आधार कार्ड बनविण्यात गोंदिया जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर तर भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आला आहे.

5.96 lakh laborers registration in the district! | जिल्ह्यात ५.९६ लाख मजुरांची नोंदणी!

जिल्ह्यात ५.९६ लाख मजुरांची नोंदणी!

Next

राज्यात गोंदिया दुसरा : तीन लाख मजुरांना आधार
नरेश रहिले गोंदिया
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजूरांचे आधार कार्ड बनविण्यात गोंदिया जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर तर भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आला आहे. नरेगाअंतर्गत होणाऱ्या कामात ज्या मजुरांनी आधार कार्डची नोंदणी केली त्यांची टक्केवारी ४७.९ टक्के आहे. नरेगाअंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी मजूरी हवी म्हणून गोंदिया जिल्ह्यातील तब्बल ५ लाख ९६ हजार ६७३ लोकांनी आपली नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील लोकसंख्या १३ लाखाच्या घरात असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर मजुरांची नोंदणी होणे ही बाब आश्चर्यकारक ठरत आहे.
नोंदणी केलेल्या एकूण मजुरांपैकी २ लाख ३५ हजार ६०१ मजुरांकडे आधार कार्ड आहे. यातील दोन लाख २१ हजार ५३२ लोकांच्या आधार कार्डाची पुनर्तपासणी झाली आहे. दोन लाख ३५ हजार ६०१ मजूरांनी बँकेत खाते उघडले आहे. डाकघरात खाते उघडणाऱ्या मजुरांची संख्या २६१० आहे.

४८१४ कुटुंबांनी मागितले काम
जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील चार हजार ८१४ कुटुंबानी डिसेंबर महिन्यात काम मागितले आहे. यात आमगाव २१७, अर्जुनी-मोरगाव ५११, देवरी ४७८, गोंदिया ११२६, गोरेगाव २४२, सडक-अर्जुनी १०३३, सालेकसा ४२४ व तिरोडा तालुक्यातील ७८३ कुटुंबाचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात ४ हजार २५३ कुटुंबाच्या हाताला काम देण्यात आले.

राज्यापेक्षा जिल्ह्याची टक्केवारी अधिक
राज्यात नरेगाअंतर्गत होत असलेल्या कामावर मजुरी मिळावी यासाठी एक कोटी ९१ लाख ९७ हजार ७५८ मजुरांनी नोंदणी केली आहे. यातील ४७ लाख ९४ हजार १२३ मजूरांकडे आधार कार्ड आहे. यापैकी बँक किंवा पोस्ट खात्यात खाते उघडणाऱ्या मजुरांची टक्केवारी राज्यात २५.२८ टक्के असली तरी गोंदिया जिल्हाची आकडेवारी ४७.९ अशी आहे.

७४८ कामे झाली पूर्ण
जिल्ह्यात नरेगांतर्गत १११० कामे मंजूर केली. मागील वर्षी ४३९ व यावर्र्षी ३८१ कामे मंजूर झाली. ७४८ कामांना मंजूरी मिळाली होती. ती कामे पुर्ण झाली आहेत. यात आमगाव तालुक्यात १९९, अर्जुनी-मोरगाव २९, देवरी ८, गोंदिया १३४, गोरेगाव १९०, सडक-अर्जुनी ६२, सालेकसा ६५ व तिरोडाच्या ६१ कामांचा समावेश आहे.

Web Title: 5.96 lakh laborers registration in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.