जिल्ह्याला हवेत पीक कर्जासाठी ६० कोटी

By admin | Published: June 15, 2017 12:18 AM2017-06-15T00:18:53+5:302017-06-15T00:18:53+5:30

कर्जाचे डोंगर घेऊन उभा असलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने अल्प व मध्यम शेतकऱ्यांची कर्जमाफी केली.

60 crore for crop loan in the district | जिल्ह्याला हवेत पीक कर्जासाठी ६० कोटी

जिल्ह्याला हवेत पीक कर्जासाठी ६० कोटी

Next

३२९ संस्थांमार्फत कर्ज वाटप : कर्जाशिवाय शेती करताच येत नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कर्जाचे डोंगर घेऊन उभा असलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने अल्प व मध्यम शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. परंतु त्या शेतकऱ्यांना पुढच्या वर्षाची शेती करण्यासाठी पैश्याची गरज असल्याने पीक कर्जाची मागणी होत आहे. दि गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉ-आॅपरेटीव्ह बैंकेच्या कार्य क्षेत्रांतर्गत ३२९ प्राथमिक कृषि सहकारी संस्था आहेत. या संस्थाच्या नविन सभासदांना पीक कर्ज घेण्याची गरज भासली आहे. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६० कोटी रूपयाची गरज आहे.
आजघडीला शेती परवडणारी नाही. शेतकऱ्यांना कर्जातून सावरण्यासाठी मागील दिड वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ५१ हजार ५४२ शेतकऱ्यांना विविध प्राथमिक कृषि सहकारी संस्थांमार्फत १८३ कोटी ६४ लाख ६७ हजार रूपयाचे कर्ज वाटण्यात आले. ४८ हजार ३३५ लघु व मध्यम भूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे.
दि गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉ-आॅपरेटिव बैंक के मुख्य कार्यकारी अधिकारी विलास वासनिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१६-१७ च्या खरीप व रबी पिकासाठी सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना १४० कोटी ५५ लाख रूपये कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट्ये ठेवण्यात आले होते. या वर्षात ३२९ विविध प्राथमिक कृषि सहकारी संस्थांद्वारे ३३ हजार १५३ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ७८२ हेक्टर खरीप व रबी पिकासाठी ११२ कोटी ८८ लाख २२ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. खरीपासाठी ३२८ संस्थांमार्फत ३२ हजार ६१० शेतकऱ्यांना ३४ हजार २१९ हेक्टर पीकांसाठी १११ कोटी ६ लाख ७२ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. तर रबी पिकासाठी २२ संस्थांमार्फत ५४३ शेतकऱ्यांना ५६३ हेक्टरसाठी एक कोटी ८ लाख १५ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले.
सन २०१७-१८ मध्ये खरीपपिकासाठी १०५ कोटी ५७ लाख रूपये कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट्ये ठेवण्यात आले. यात २ जून २०१७ पर्यंत २९६ संस्थामार्फत १८ हजार ३८९ शेतकऱ्यांना १९ हजार ९९२ हेक्टर पीकासाठी ७० कोटी ७६ लाख ४५ हजार रूपये म्हणजेच ६७.०३ टक्के कर्ज वाटप करण्यात आले. रबी पिकासाठी ९ कोटी ४३ लाखाचे उद्दीष्ट्ये ठेवण्यात आले आहे.

३२०७ मोठ्या शेतकऱ्यांना ३२ कोटींचे कर्ज वाटप
विविध प्राथमिक कृषि सहकारी संस्थांद्वारे सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये २ जून पर्यंत ३ हजार २०७ मोठ्या शेतकऱ्यांना ९ हजार ७४६ पीकासाठी ३२ कोटी ६८ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. या काळात ४८ हजार ३३५ लघु व मध्यम शेतकऱ्यांना ४५ हजार २८ हेक्टर पीकांवर १५१ कोटी ६३ लाख ९९ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. सन २०१६-१७ मध्ये ३२९ संस्थाद्वारे ३१ हजार २३३ शेतकऱ्यांना रबी व खरीपाच्या २८ हजार ७८२ हेक्टर पीकासाठी ९३ कोटी ६४ लाख ६४ हजार रूपये व सन २०१७-१८ मध्ये २ जून पर्यंत २९६ संस्थाद्वारे १७ हजार १०२ शेतकऱ्यांच्या १६ हजार २४६ हेक्टर खरीप पिकासाठी ५७ कोटी ९९ लाख ३५ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आला आहे.
 

Web Title: 60 crore for crop loan in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.