सालेकसा तालुक्यात ६० टक्के मुली उच्चशिक्षणापासून दूर

By Admin | Published: January 3, 2017 12:33 AM2017-01-03T00:33:26+5:302017-01-03T00:33:26+5:30

दरवर्षी आपण ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

60 percent of girls in Sailakasa taluka are away from higher education | सालेकसा तालुक्यात ६० टक्के मुली उच्चशिक्षणापासून दूर

सालेकसा तालुक्यात ६० टक्के मुली उच्चशिक्षणापासून दूर

Next

परंपरेच्या बेड्यातून मुक्ती नाहीच : पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिला निर्णयाच्या अधिकारापासून वंचित
विजय मानकर ल्ल सालेकसा
दरवर्षी आपण ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
सावित्रीबाईनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याची आठवण यानिमित्ताने केली जाते. तसेच जयंतीचेनिमित्त मुलीच्या शिक्षणाबद्दल मुल्यांकन केले जात असते. परंतु समाजातील वास्तव एवढे गंभीर आहे की वेगवेगळ्या कारणांमुळे ग्रामीण महिला शिक्षण, स्वातंत्र्य, समता, स्वालंबनच्या बाबतीत कोसोदूर आहेत. सालेकसा तालुक्यात आजही ६० टक्के मुली उच्च शिक्षणापासून (महाविद्यालयापासून) दूरच आहेत.
८० ते ९० टक्के महिला आजही पुरुषाच्या मर्जीशिवाय घराबाहेर पाय ठेवू शकत नाहीत. ५० टक्यांपेक्षा जास्त महिला आजही वेगवेगळ्या अत्याचाराला बळी पडतात. यावरुन एक प्रश्न उद्भवतो की जमिनीवर खऱ्या अर्थाने महिलांना वेग वेगळ्या बंधनातून मुक्ती केव्हा मिळणार. महिलांना मुक्तीच्या मार्गावर नेण्यासाठी सामाजिक परंपरा व रुढी आदीच्या रुपात लागलेल्या कुलूपाची किल्ली म्हणजे शिक्षण. शिक्षण घेतल्याशिवाय महिलाचा सर्वांगिण विकास होणे कठिण आहे. परंतु शिक्षणाच्या मार्गावर चालताना मार्ग मधातच संपणाारी यात्रा दाखवत असेल तर शिक्षण कसे पूर्ण होणार?
सालेकसा तालुका हा मागासलेला गरीब आदिवासी तालुका असून या तालुक्यात महिलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे दोन महत्वाचे कारण जास्त प्रभावीरित्या डोकावताना दिसून येतात असे या तालुक्यात नजर टाकल्यास आढळले यात पहिला कारण म्हणजे आर्थिक दुर्बलता आणि दुसरा म्हणजे घातक सामाजिक रुढी प्रथा व परंपरा मुलीच्या शिक्षणाबद्दल जमिनी वास्तव पाहिल्यावर असे आढळून आले की मुख्यालयाशी संबंधीत क्षेत्रातील ३० टक्के मुली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणापासून दूर होतात. तर सर्वसामान्य ग्रामीण भागात ६० टक्के मुली महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर पोहचू शकत नाही. तर आदिवासी अतिदुर्गम भागातील ९० टक्के मुलींना महाविद्यालयातील पदवी अभ्यास क्रमापासून मुकावे लागते. या मागे वेगळेवेगळे कारण आढळून आले. यात तालुक्याला तीन भागात ठेवून वास्तव समजण्यासाठी अभ्यास केल्यावर असे समजले की पहिला भाग शहरीकरण झालेला म्हणजे मुख्यालयाचा व संलग्णीत भाग जेथे शिक्षणाचे साधन आहेत परंतु तरीसुद्धा ३० टक्के मुली महाविद्यालयात जात नाही. यात १० टक्के १२ वी नंतर लग्नाच्या बंधनात अडकून संसार चालवण्याचा ओढ्यात खली जातात. १० टक्के मुलीचे आई-वडील पुढे शिकविण्यात असमर्थता व्यक्त करतात. मुलीची इच्छा असेल तरी शिकवण नाही. तर १० टक्के मुली वेगवेगळ्या कारणामुळे महाविद्यालयापासून दूर राहतात. दुसरा भाग सर्व सामान्य शेतकरी वर्ग किंवा मध्यम वर्गाचा विचार केीला तर या वर्गातील ६० टक्के मुली महाविद्यालय पोहचू शकत नाही. यामध्ये २० टक्के मुली किंवा त्यापेक्षा जास्त या आई-वडीलांच्या मर्जीनुसारण लग्न करुन मधातच शिक्षण सोडून टाकतात. २० टक्के पालक मुलींना कॉलेजात पाठवू शकत नाही. तर २० टक्के मुली वेगवेगळ्या कारणामुळे पुढचे शिक्षण थांबवतात यात स ाधनांचा अभाव, अयोग्यता, प्रथा, परंपरा, व्यवस्थेची कमी इत्यादी अनेक कारणे आहेत.
तिसरा भाग म्हणजे मागासलेला आदिवासी डोंगराळ भाग असून या भागातील ९० टक्ेक मुली आज ही महाविद्यालयीन शिक्षणापासून कोषो दूर आहेत. असे दिसून येत आहे. आदिवासी भागाचा ग्राऊंड रिपोर्ट बघितला तर असे दिसूनस येते की ६० टक्के पालक आपल्या मुलीला महाविद्यालयापर्यंत पाठविण्यात असमर्थ असतात. यात आर्थिक कमजोरी असून घरातील लोक शिक्षणाचा खर्च उचलण्यात असमर्थ असून उलट बारावी नंतरच्या मुलीला अर्थाजनासाठी उपयोग करुन घेतात व घर चालविण्यात मदत घेतात. तसेच सालेकसा तालुका हा भौगोलिक दुष्ट्या विस्तारलेला असून अनेक गावे मुख्यालयापासून फारच दूर दूर वर आहेत. आणखी महाविद्यालयीन शिक्षणाची सोय फक्त तालुक्याच्या ठिकाणाी आहे. मुलींना सायकलने प्रवारी करीत ३० कि.मी. लांब अंतर पार करणे अनेक प्रकारे दुर्लक्ष असतो. मुख्यालयाठिकाणी मुलीचे वस्तीगृह आहे. परंतु तिथे प्रवेश मर्यादा आहे. तसेच माध्यमिक ते महाविद्यलय सर्वांना प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे महाविद्यालय मुलीची संख्या फार कमी असते. २० टक्के मुली विविध कारणामुळे महाविद्यालय जाऊ शकत नाही. असे एकंदरित तालुक्याचा वरवर आकडा काढला तर आज ही ६० टक्के मुली. माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक नंतर शिक्षणापासून वंचित राहतात. अशात मुलीचा शैक्षणिक त्याच बरोबर सामाजिक, आर्थिक विकास सुद्धा प्रभावित होताना दिसतो.
सावित्रीबार्इंनी स्त्री शिक्षणासाठी क्रांतीची मशाल पेटविली व स्त्रींना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी ऐतिहासिक प्रारंभ केला. त्यांच्या कार्याला १५० वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला, तरीही आजही समाज दारिद्र्य, वाईट प्रथा, परंपरा, मानसिक गुलामी, पडदा प्रथा इत्यादी कारणे, त्याचबरोबर साधनांचा अभाव मिळणाऱ्या सवलतींचा लाभ न घेते. इत्यादी कारणांमुळे ग्रामीण महिलांना अजून मुक्ती घेण्यास किती वर्षे लागतील हे सांगणे कठिण आहे.

Web Title: 60 percent of girls in Sailakasa taluka are away from higher education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.