जीएसटीमुळे ६० टक्के व्यापार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:52 AM2017-08-09T00:52:20+5:302017-08-09T00:54:12+5:30

60 percent trade jam due to GST | जीएसटीमुळे ६० टक्के व्यापार ठप्प

जीएसटीमुळे ६० टक्के व्यापार ठप्प

Next
ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र सरकारने १ जुलैपासून लागू केलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) मुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील ६० टक्के व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे देशातील अनेक उद्योग डबघाईस येण्याची शक्यता असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (दि.८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
जीएसटी लागू करण्यापूर्वी कोणत्याही व्यापाºयाशी व्यवहार करता येत होता. मात्र आता जीएसटी भरणाºयाच व्यापाºयाशी व्यवहार करण्याची अट लागू केली आहे. अन्यथा ३६ टक्के दंडाची तरतूद आहे. यामुळे व्यापाºयांना व्यापार करणे कठीण होत आहे. केंद्र सरकारचा जीएसटीच्या माध्यमातून व्यापाºयांच्या नफ्यावर डोळा असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. जीवनाश्क वस्तू वगळता सर्वच व्यापारावर परिणाम झाला आहे. जीएसटीच्या माध्यमातून देशातील व्यापाºयांना अडचणीत आणून बाहेरील व्यापाºयांना येथे बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे सरकारचे धोरण आहे. सरकारला मेड इंडियात नव्हे तर मेक इन इंडियात अधिक रस आहे. मेक इंडियातंर्गत देशाबाहेरील उद्योजकांना येथे येऊन व्यापार करता येतो. पण मेड इंडियात हे शक्य नाही. त्यामुळे सरकारला मेक इंडियात अधिक रस असल्याचे आंबेडकर म्हणाले. भाजप सरकार देखील भ्रष्टाचारी असून त्यांचे एक एक प्रकरण पुढे येत आहे. जे धोरण काँग्रेसचे होते तेच भाजपाचे आहे. मागील तीन वर्षात भाजप सरकारने केवळ माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी प्रस्तावित केलेल्या कामांचे उद्घाटन करण्यापलिकडे काहीच केले नाही. सामान्य माणसाच्या खिशातील पैसे काढण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. तसेच राष्टÑीय स्वंयसेवक संघ आणि भाजप सरकारकडून कायद्याची पायमल्ली केली जात आहे. या सरकारला धडा शिकविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले.
तूरडाळ आयातीत मोठा घोटाळ
गेल्यावर्षी देशात तुरीचे विक्रम उत्पादन होणार असा अंदाज कृषी मंत्रालयाने वर्तविला होता. त्यानंतरही केंद्र सरकारने विदेशातून मोठ्या प्रमाणावर तूरडाळ आयात केली. परिणामी स्थानिक व्यापाºयांना त्याचा फटका बसला व तुरीचे दर पडले. तूरडाळीची आयात केवळ पाच बड्या व्यापाºयांना फायदा पोहोचविण्यासाठी करण्यात आली. यात मोठ्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.
 

Web Title: 60 percent trade jam due to GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.