कत्तलखान्यात जाणाऱ्या ६२ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 09:33 PM2018-09-03T21:33:46+5:302018-09-03T21:34:04+5:30
रात्रीच्यावेळी जनावरांची कत्तलखान्यासाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती सालेकसा पोलिसांना मिळताच रविवारच्या पहाटे सापडा रचून कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांचे चार वाहने जप्त करण्यात आले. या प्रकरणात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रात्रीच्यावेळी जनावरांची कत्तलखान्यासाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती सालेकसा पोलिसांना मिळताच रविवारच्या पहाटे सापडा रचून कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांचे चार वाहने जप्त करण्यात आले. या प्रकरणात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सालेकसा मार्गावरुन कत्तलीसाठी जनावरे वाहून नेत असल्याची गुप्त माहिती सालेकसा पोलिसांना मिळाली. यानंतर त्यांनी या मार्गावर पाळत ठेवून चार वाहने पकडली. ट्रक एमएच ४० ६१३७ मध्ये ३० जनावरे डांबून ठेवली होती. यात जप्त केलेल्या जनावरांची किंमत एक लाख २० हजार तर ट्रकची किंमत ६ लाख रूपये सांगितली जाते. ट्रक बीजी ०४ जेबी ८४५३ मध्ये ३२ जनावरे डांबून होती. त्या जनावरांची किंमत एक लाख २८ हजार तर ट्रकची किंमत ६ लाख रूपये सांगितली जाते. या जनावरांना कत्तलखान्यात नेण्यासाठी रस्त्यात कुठलीही अडचण होऊ नये, यासाठी त्यांच्या मदतीला पांढºया रंगाची बोलेरो एमपी ५० बीसी १०५० किंमत ४ लाख ५० हजार व काळ्या रंगाची बोलेरो सीजी ११ बीए ४५२७ किंमत ३ लाख हजार ही वाहने होती. सदर जनावरे हैद्राबाद येथे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती मिळाली.
या प्रकरणात एकूण २२ लाख ४८ हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींध्ये योगेश आनंदराव मडावी (२८) रा. देवरी, देवेंद्र शामराव राऊत (२७) रा.आंबोरा चिचगड, रूकसाद मुनिर पठाण (२७) रा. देवरी, आनंद अनिल जगने (२५) आंबोरा चिचगड, पिरया खान मोहम्मद खान (२८) रा.टिमकीटोला रिशेवाडा (मध्यप्रदेश), समीरउल्ला रहेमतउल्ला खान (३८) रा. मुनसीटोला, अली अमर हुसेन (२८) रिशेवाडा (मध्यप्रदेश), शहबाज मोहम्मद खान (३५) टिमकीटोला बहेला (मध्यप्रदेश), नूरखान उर्फ फुले मोहम्मद खान (४०) टिमकीटोला बहेला, राजू प्रेमलाल मोहबे (४३) रा. चिचटोला (पिपरीया) यांचा समावेश आहे.
सदर आरोपींविरूध्द सालेकसा पोलिसांनी प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१), (ड), (ह) प्राणी संरक्षण अधिनियम ५ अ (१) सहकलम ११९ महाराष्टÑ पोलीस अधिनियम, १८४ मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तस्करीसाठी गडचिरोली मार्गाचा वापर
गोंदिया, बालाघाट, छत्तीसगड येथून जनावरे खरेदी करुन त्यांची कत्तलखान्याकडे वाहतूक करण्यासाठी तस्करांनी गडचिरोली मार्गाचा वापर करीत असल्याची माहिती आहे. या जिल्ह्यात वैनगंगा नदीवर तयार करण्यात आलेल्या पुलामुळे थेट हैद्राबाद येथे जाता येते. त्यामुळे जनावरांची तस्करी करणारे या मार्गाचा सर्वाधिक वापर करीत असल्याची माहिती आहे.
कारवाई टाळण्यासाठी चलाखी
जनावरांची तस्करी करण्यासाठी व पोलिसांची कारवाई टाळता यावी. तस्करी करणारे जनावरे वाहून नेणाऱ्या वाहनाच्या मागे दोन खासगी चारचाकी वाहने ठेवीत आहे. जनावरांची वाहतूक करताना कुठे पोलिसांची तपासणी सुरू आहे का, याची माहिती या वाहनात बसलेले तस्कर घेत असल्याची माहिती आहे.