खरिपासाठी ६२ हजार ९०० मेट्रिक टन खत मंजूर

By admin | Published: June 4, 2017 12:49 AM2017-06-04T00:49:31+5:302017-06-04T00:49:31+5:30

शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत असताना पिकांसाठी लागणाऱ्या ६० हजार मेट्रिक टन खताची मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली.

62 thousand 9 00 metric ton of fertilizers approved for Kharif | खरिपासाठी ६२ हजार ९०० मेट्रिक टन खत मंजूर

खरिपासाठी ६२ हजार ९०० मेट्रिक टन खत मंजूर

Next

पूर्वतयारीला वेग : महिन्याभरात २४५२.९५ मे.टन खताचा पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत असताना पिकांसाठी लागणाऱ्या ६० हजार मेट्रिक टन खताची मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली. यात १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंत एका महिन्यात २४५२.९५ मे.टन खताचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. पुरवठा करण्यात आलेला व मागील वर्षाचा शिल्लक साठा मिळून ९९७५.८८ मे.टन खत शिल्लक आहे. सद्यस्थितीत या खताची विक्री झालेली नाही.
सन २०१७ च्या खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेची युरिया खताची मागणी ३० हजार मे.टन होती. यात २७ हजार ५०० मे.टन मंजूर करण्यात आले. तर ३१ मार्चपर्यंत १७६५.२ मे.टन युरिया शिल्लक होता व ३१ मेपर्यंत २६२ मे.टन पुरवठा करण्यात आला. असा एकूण युरियाचा २०२७.२ मे.टन साठा शिल्लक आहे. तसेच डीएपी खताची मागणी तीन हजार मे.टन असून तीन हजार २०० मे.टन मंजूर करण्यात आले. पूर्वीचा शिल्लक साठा २७३.३५ मे.टन होता. त्यात पुरवठा करण्यात आलेल्या नऊ मे.टनाची भर पडून सध्या २८२.३५ मे.टन साठा शिल्लक आहे.
एमओपी खताची मागणी ७२५ मे.टन असून एक हजार २०० मे.टन मंजूर करण्यात आले. ९८.७५ मे.टन मागील शिल्लक असून १९३.९५ मे.टन पुरवठा करण्यात आला. सध्या २९२.७ मे.टन एमओपी शिल्लक आहे. एसएसपी खताची मागणी १२ हजार २०० मे.टनाची होती. १७ हजार ९०० मे.टन मंजूर झाले. शिल्लक साठा दोन हजार २४९ मे.टन असून पुरवठा ४६० मे.टन झाला. असा एकूण शिल्लक साठा दोन हजार ७०९ मे.टन आहे.
याशिवाय १५.१५.१५, २०.२०.०, २०.२०.१३, २४.२४.०, १२.३२.१६, १६.१६.१६ या खतांचीही खरिपासाठी मागणी करण्यात आलेली आहे. मात्र सद्यस्थितीत या रासायनिक खतांच्या मागणीला मंजुरी मिळाली नसल्याचे समजते. मात्र या खतांचा मागील वर्षाचा काही साठा शिल्लक असल्याचे जि.प. कृषी विभागाने सांगितले आहे.

संयुक्त व मिश्र खते
खरिपासाठी जिल्हा परिषदेने १४ हजार ०७५ मे.टन संयुक्त खताची मागणी केलेली आहे. यापैकी १३ हजार १०० मे.टन मंजूर झाले आहे. तर १ एप्रिल २०१७ पर्यंत एक हजार ९५८.९८ मे.टन शिल्लक होते. त्यात ३१ मेपर्यंत एक हजार ३२८ मे.टन पुरवठा करण्यात आल्याने सध्या तीन हजार २८६.९८ मे.टन संयुक्त खताचा साठा शिल्लक आहे. तर मिश्र खताची सध्या मागणी करण्यात आलेली नाही. मात्र १ एप्रिल २०१७ पर्यंत एक हजार १७७.६५ मे.टन मिश्र खताचा साठा होता. तर ३१ मे पर्यंत २०० मे.टन पुरवठा झाल्याने त्यात भर पडून सध्या एक हजार ३७७.६५ मे.टन मिश्र खतांचा साठा शिल्लक आहे.

Web Title: 62 thousand 9 00 metric ton of fertilizers approved for Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.