ई-मेल आयडी हॅक करून बोगस क्रेडिट कार्ड बनवून केली ६.२८ लाखांनी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 03:32 PM2024-10-15T15:32:33+5:302024-10-15T15:33:39+5:30

६.२८ लाखांनी गंडविले : न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

6.28 lakh cheated by hacking e-mail id and making bogus credit card | ई-मेल आयडी हॅक करून बोगस क्रेडिट कार्ड बनवून केली ६.२८ लाखांनी फसवणूक

6.28 lakh cheated by hacking e-mail id and making bogus credit card

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
तरुणाच्या आधार व पॅन कार्डच्या माध्यमातून ई-मेल आयडी हॅक करून, तसेच दुसऱ्या तरुणाच्या क्रेडिट कार्डच्या आधारे सहा लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सालेकसा तालुक्यातील ग्राम हेटीटोला येथे घडलेल्या या प्रकारात आमगाव येथील न्यायालयाच्या आदेशावरून आमगाव पोलिसांनी त्या आरोपींसह या कामात सहभागी असलेल्या १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


२७ ते ३० नोव्हेंबर २०२३ या दरम्यान घडलेल्या या प्रकारात सालेकसा तालुक्यातील ग्राम हेटीटोला येथील सागर भागवत बागडे (२७) या तरुणाचा मोबाइल व ईमेल आयडी हॅक करून त्याचे उत्पन्न जास्त दाखवून आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने तयार करून आरोपींनी सहा लाख २६ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्या कर्जाच्या रकमेतून आरोपींनी सोने व इतर साहित्य खरेदी करून विजय कोरे यांच्या नावाने बिल तयार केले. आमगाव पोलिसांनी शिताफीने या प्रकरणाचा तपास करून आमगाव न्यायालयाच्या आदेशावरून १३ आरोपींवर भादंवि कलम ४२०, ४२३, ४६४,४७१, ३४ माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ सी, ६६ ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक तिरुपती राणे करीत आहेत. 


आरोपींमध्ये यांचा समावेश 
या प्रकरणात आरोपी मनोज हिरालाल जुनघरे (रा. गोकुळनगर, गडचिरोली), निखिल नरेंद्रसिंह कोसले (रा. कमल विहार, रायपूर-छत्तीसगड), मंगेश लालाजी दुर्गे (रा. गोकुळनगर, गडचिरोली), विकीसिंग नरेंद्रसिंग कोसले (५७, कमल विहार सेक्टर-८, रायपूर), नीलेश लोकेश सुनहरे (रा. कमल विहार, सेक्टर-८, रायपूर) व बँकांचे प्रतिनिधी अशा १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 6.28 lakh cheated by hacking e-mail id and making bogus credit card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.