जिल्ह्यातील ६३ टक्के शाळा प्रगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2017 12:32 AM2017-03-09T00:32:18+5:302017-03-09T00:32:18+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचा माणस आहे.
शैक्षणिक क्रांती : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमामुळे सुधारतोय शैक्षणिक स्तर
नरेश रहिले गोंदिया
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचा माणस आहे. शाळेत भौतिक सुविधाच नव्हे तर विद्यार्थी प्रगत करण्याकडेही लक्ष आहे. जिल्ह्यातील ६३ टक्के शाळा आतापर्यंत शंभर टक्के प्रगत झाल्याचा अहवाला शिक्षण विभागाकडे आहे.
आधुनिक विज्ञान युगात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी एका क्लीकवर पाठ्यक्रमाची माहिती मिळावे म्हणून शाळा डिजीटल करण्यात येत आहेत. विद्यार्थी स्मार्ट व्हावा यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम अमंलात आणला.
मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वर्षापर्यंत प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासन व ं स्थानिक स्वराज्य संस्थाची आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षणात गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम आणण्याचा प्रयत्न प्राथमिक शिक्षण विभागाचा आहे. बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी १०० टक्के विद्यार्थी विकसित करणे, प्रत्येक शाळेत स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर देणे, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पनाशक्तीला गती वाढविण्यासाठी, शैक्षणिक साहित्यावर भर देणे, विद्यार्थ्यांना स्वयंअध्यनाकडे आकर्षीत करणे, कठिण विषयात विद्यार्थ्यांना रूची निर्माण करणे, शिक्षकाला विषयात विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती दूर करणे या विषयावर भर देण्यात आला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्यात शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी २०१७ च्या अखेरपर्यंत १०४८ पैकी ६५७ शाळा प्रगत झाल्या आहेत.
जिल्ह्यात ज्ञान रचनावाद व नविन तंत्रज्ञानाने विद्यार्थी प्रेरणादायी झाले आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती होत आहे. मोठ्या प्रमाणात प्रगत शाळा होत आहेत.यामागे शिक्षकांची अंगमेहनत आहे. लोकसहभागही मिळत आहे.
-उल्हास नरड
शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प. गोंदिया.