६३ हजार नागरिकांचे होणार ‘महासमाधान’

By admin | Published: February 20, 2017 12:50 AM2017-02-20T00:50:14+5:302017-02-20T00:50:14+5:30

विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागू नये ...

63 thousand citizens will be honored | ६३ हजार नागरिकांचे होणार ‘महासमाधान’

६३ हजार नागरिकांचे होणार ‘महासमाधान’

Next

विविध योजनांसह दिव्यांगांना लाभ : उद्यापासून अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी व गोरेगावमध्ये शिबिर
गोंदिया : विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागू नये आणि पात्र लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी, कमीत कमी श्रमात योजनांचा लाभ मिळावा यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या तीन तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी ‘महासमाधान शिबिरा’चे आयोजन केले जात आहे. दि.२१ ते २३ फेब्रुवारी असे तीन दिवस तीनही तालुका मुख्यालयी होणाऱ्या या शिबिरातून ६३ हजार पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
जुलै २०१६ मध्ये महाराजस्व अभियान राबविण्यात आले होते. त्याअंतर्गत अर्जुनी- मोरगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी या तालुक्यात पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. याशिवाय दिव्यांग स्वावलंबन अभियानांतर्गत दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक ठरणारे साहित्य व साधने मोजमाप शिबिर म्हणून पूर्वतयारी समाधान शिबिर घेण्यात आले होते. त्यात ४८ हजार नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. त्यातून निवडलेल्या लाभार्थ्यांनाही या शिबिरात साहित्यांचे वाटप होणार आहे.
संबंधित योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देता यावा यासाठी तिन्ही तालुक्यात महावितरण महासमाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरु वात अर्जुनी -मोरगाव येथून केली जात आहे. दि.२१ फेब्रुवारीला अर्जुनी-मोरगाव येथील तहसील कार्यालयात संबंधित गरजू व पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात येणार आहे. याचप्रमाणे दि.२२ रोजी सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयात तर २३ रोजी गोरेगाव येथील पंचायत समितीच्या प्रांगणात हे महावितरण शिबीर घेण्यात येणार आहे.
या शिबिरात विविध योजनांसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांमध्ये अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील ४५०० लाभार्थ्यांना शिधापत्रिका, ५३३ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना., १२१२ लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजना, १८५ राष्ट्रीय कुटूंब, २६९ आम आदमी विमा, इंदिरा गांधी रा.वि.नि.वे.योजनेसाठी १२१ लाभार्थी, जमीन वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रु पांतर ३०२८, संपत्तीचे आपसी वाटणीपत्र ५८, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र १३ हजार ७६, जातीचे प्रमाणपत्र ७ हजार ७११, जमीन मोजणी ५६, जमीन सुपिकता प्रमाणपत्र ६ हजार ५८१, कृषीपंप विद्युत जोडणी २२८, वीज व्यवसायिक जोडणी २८, घरघुती वीज जोडणी ५२१, रमाई घरकूल ४०, इंदिरा आवास १८१, मुद्रा बँक कर्ज ४६, सुकन्या समृध्दी योजना १००, पीक विमा योजना ८ हजार ३४०, शेतकरी अपघात विमा योजना १६, आंतरजातिय विवाह प्रोत्साहन योजना १७, वन्यप्राण्यांनी केलेली नुकसानभरपाई १२७, महामंडळाद्वारे कर्ज पुरवठा १७७, वनहक्क जमीनीचे पट्टे वाटप ६५, विद्यार्थी सायकल वाटप २४१, शिलाई मशिन वाटप ६०, अपंगत्व ओळखपत्र २१३, आधारकार्ड, मतदान कार्ड, अधिवास प्रमाणपत्र ६ हजार ५००, डिझेल पंप वाटप ३०, उज्वला गॅस कनेक्शन वाटप ६ हजार ३२३, जननी सुरक्षा योजना २७९, मानव विकास कार्यक्र म ३००, माहेरघर योजना २३, वन विभाग गॅस पुरवठा २००, शेडनेट पॉलिहाऊस २५, बैलजोडी ५९, जनधन योजना १५६, पाईप वाटप ५० नग १३ लाभार्थी, शेतीपयोगी औजारे धान उडविणारे पंखे ५, बैलगाडी २८, पी. आर. कार्ड १००, बचत गटांना मिनी ट्रॅक्टर १९, अपंगत्व प्रमाणपत्रे २०४, अपंग व्यक्तींना सहाय्यक साधने व उपकरणे वाटप ६२६, गटई कामगारांना स्टॉल वाटप ९, आदी साहित्यांचे वाटप पालकमंत्री ना. बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.
याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमीत्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि.२१ ला सायंकाळी ७.३० वाजता ‘वादळाची सावली’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ७.३० वाजता सप्तखंजिरी वादक तुषार सूर्यवंशी यांचा राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्र म व गोरेगाव येथे २३ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या प्रांगणात सायंकाळी ७.३० वाजता ‘वादळाची सावली’ या नाटकाचा प्रयोग सादरीकरण करण्यात येणार आहे. या महासमाधान शिबिरासह आयोजित कार्यक्र मांचा लाभ नागरिकांनी व दिव्यांग बंधू- भगिनींनी घेण्याचे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 63 thousand citizens will be honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.