64 जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 05:00 AM2020-12-29T05:00:00+5:302020-12-29T05:00:22+5:30
जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली. मात्र यापूर्वी केवळ दोनच उमेदवारांनी अर्ज दाखल होते. त्यानंतर सलग तीन दिवस सुट्या आल्याने अर्ज दाखल करता आले नाही. सोमवारी (दि.२८) जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण ६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना अद्यापही अर्ज भरण्यासाठी वेग आला नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीच्या एकूण १६३४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी ३ लाख ३८ हजार ४०५ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे.
यंदा सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांमध्ये उत्साहाचा अभाव दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना अद्यापही उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. मंगळवार आणि बुधवारी या दोनच दिवसात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपले सेवा केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांना निवडणूक विभागाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करुन त्याची मूळ प्रत तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे जमा करावी लागणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खाते उघडण्याची अट ठेवली आहे.
त्यामुळे खाते उघडण्यासाठी सुध्दा मतदारांना बरीच पायपीट करावी लागत आहे. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उशीर होत असल्याचे बोलल्या जाते.
पुढील दोन दिवस
ठरणार महत्वपूर्ण
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना २३ ते ३० डिसेंबर या कालावधी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवसांचा कालावधी शिल्लक हे दोन दिवस उमेदवारांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.