दोन दिवसात जि.प.साठी ६५ नामांकन

By admin | Published: June 14, 2015 01:52 AM2015-06-14T01:52:02+5:302015-06-14T01:52:02+5:30

जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसह व सर्व आठ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर आॅनलाईन नामांकन प्रक्रियेने वेग घेतला आहे.

65 nominations for ZP in two days | दोन दिवसात जि.प.साठी ६५ नामांकन

दोन दिवसात जि.प.साठी ६५ नामांकन

Next

रविवारीही कामकाज सुरू : सर्व तालुक्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसह व सर्व आठ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर आॅनलाईन नामांकन प्रक्रियेने वेग घेतला आहे. बुधवारपासून नामांकन दाखल करण्याची मुभा असली तरी शुक्रवारी पहिले नामांकन दाखल झाले. शनिवारी त्यात आणखी भर पडली. दोन दिवसात जिल्हा परिषदेसाठी ६५ तर पंचायत समित्यांसाठी ७१ नामांकन दाखल झाले आहेत.
नामांकन दाखल करण्यासाठी सोमवार दि.१५ ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे रविवारीसुद्धा (दि.१४) नामांकन दाखल करून घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज राहणार आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचन गणांकरीता निवडणुक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यात गोंदिया तालुका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संजय पवार व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी एस.के. वालकर यांचा समावेश आहे.
आमगाव तालुका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी प्राशांत काळे, सहायक निवडणूक अधिकारी तहसलीदार राजीव शक्करवार व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी सी.डी. मून, सालेकसा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, स.निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार एन.जे. उईके व अतिरिक्त स.निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी एस.एन वाघाये, गोरेगाव तालुका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी बकुलराव घाटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार बी.आ. बांबोळे तर अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी डी.बी. हरिणखेडे, तिरोडा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार रविंद्र चव्हाण व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी नारायण जमईवार, सडक-अर्जुनी, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शोभाराम मोटघरे व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी आर.जे. धांडे, देवरी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीदार संजय नागटिळक व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी एस.एन. मेश्राम, अर्जुनी-मोरगाव निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी एम.ए. राऊत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार एच.आर. रहांगडाले व अति.स.निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी जी.डी. कोरडे काम पाहतील. (जिल्हा प्रतिनिधी)
जात वैधता प्रमाणप्रत्राला सहा महिन्यांची मुदत
या निवडणुकांसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र यात सुधारणा केली असून नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकापूर्वी जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी अर्ज केला असेल परंतू नामनिर्देशन भरण्याच्या तारखेला वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसेल अशा उमेदवाराला नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमानपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे उमेदवाराचा अर्ज असल्याचा कोणताही पुरावा सादर करावा लागणार आहे. त्यानंतर उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र सादर करावे लागणार आहे. मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द करण्यात येणार आहे.

Web Title: 65 nominations for ZP in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.