68 हजार मुलांचे होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 05:00 AM2021-12-31T05:00:00+5:302021-12-31T05:00:01+5:30

देशात १८ वर्षांपुढे लसीकरणाला सुरूवात झाली असून, त्याखालील मुलांचे लसीकरण अदयाप सुरू झालेले नाही. मात्र, आता ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत केंद्र शासनाने राज्यात ३ जानेवारी २०२२पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले व मुलींना कोविड-१९ लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात ६८,३२१ मुले व मुलींना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे.

68,000 children to be vaccinated | 68 हजार मुलांचे होणार लसीकरण

68 हजार मुलांचे होणार लसीकरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात वाढत असलेले कोविड रुग्ण व आढळून येत असलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड-१९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑफ ईम्युनायजेशन तसेच स्टॅंडिंग टेक्निकल सायंटिफिक कमिटी यांनी कोविड-१९ लसीकरण वाढविण्यासाठी केंद्राला राज्यांमध्ये १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुले व मुलींना कोविड लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार १५ ते १८ वयोगटात जिल्ह्यातील ६८,३२१ मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे, त्यांना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. 
कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूने सध्या जगभरात दहशत माजवली आहे. भारतातही आता ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून, झपाट्याने रूग्ण वाढत आहे. देशात १८ वर्षांपुढे लसीकरणाला सुरूवात झाली असून, त्याखालील मुलांचे लसीकरण अदयाप सुरू झालेले नाही. 
मात्र, आता ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत केंद्र शासनाने राज्यात ३ जानेवारी २०२२पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले व मुलींना कोविड-१९ लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. 
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात ६८,३२१ मुले व मुलींना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे.

लाभार्थ्यांची तालुकानिहाय आकडेवारी 
* कोविड लसीकरणासाठी तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास गोंदिया ग्रामीणमध्ये १४,९२६ व गोंदिया शहरमध्ये ६,६५६,  आमगाव तालुक्यात ६,९६१, तिरोडा तालुक्यात ८,९३४, गोरेगाव तालुक्यात ६,३५१, सालेकसा तालुक्यात ४,७८८, देवरी तालुक्यात ६,०८५, सडक-अर्जुनी तालुक्यात ५,९९६ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७,६२६ लाभार्थी आहेत.

 लसीकरणासाठी असे आहेत निकष 
* लसीकरणासाठी सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी पात्र राहतील.
* लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लसीचाच वापर करण्यात येईल.
* लाभार्थ्यांना कोविन सिस्टीमवर स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. ही ऑनलाईन सुविधा १ जानेवारी २०२२पासून सुरू होईल.
* लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध आहे.
* १५ ते १८ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र निश्चित करावे लागेल. ज्याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करणे शक्य नसेल, अशाठिकाणी स्वतंत्र रांगा असाव्यात.

 

Web Title: 68,000 children to be vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.