६९१ रूग्ण ठरले कोरोना योद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 05:00 AM2020-10-05T05:00:00+5:302020-10-05T05:00:13+5:30

देशात मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू असून जिल्ह्यात आजघडीला रूग्ण संख्या ७३४७ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतची आकडेवारी बघितल्यास सप्टेंबर महिन्याने जिल्ह्याला हेलावून सोडले असून सर्वाधिक रूग्ण संख्या सप्टेंबर महिन्यातच वाढल्याचे दिसते. सप्टेंबर महिन्यातील सुरूवाती ३ दिवस बघितल्यास १ तारखेला ६२ नवे बाधित आढळून आले होते व ३२ रूग्णांनी कोरोनावर मात केली होती.

691 patients became Corona Warriors | ६९१ रूग्ण ठरले कोरोना योद्धा

६९१ रूग्ण ठरले कोरोना योद्धा

Next
ठळक मुद्देफक्त ३ दिवसांतील आकडेवारी : ऑक्टोबर महिना ठरला दिलासादायक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सप्टेंबर महिन्यात जेथे जिल्ह्यातील रूग्ण संख्येने सर्वांनाच होलावून सोडले होते. तेथेच ऑक्टोबर महिन्याची सुरूवात आतापर्यंत दिलासादायक ठरत आहे. ऑक्टोबर महिन्यातील या ३ दिवसांत तब्बल ६९१ रूग्ण कोरोनावर मात करून कोरोना योद्धा ठरले आहेत. तर तेथेच सप्टेंबर महिन्यात हीच आकडेवारी फक्त १०१ एवढी होती.
देशात मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू असून जिल्ह्यात आजघडीला रूग्ण संख्या ७३४७ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतची आकडेवारी बघितल्यास सप्टेंबर महिन्याने जिल्ह्याला हेलावून सोडले असून सर्वाधिक रूग्ण संख्या सप्टेंबर महिन्यातच वाढल्याचे दिसते. सप्टेंबर महिन्यातील सुरूवाती ३ दिवस बघितल्यास १ तारखेला ६२ नवे बाधित आढळून आले होते व ३२ रूग्णांनी कोरोनावर मात केली होती. २ तारखेला १३७ रूग्ण आढळून आले होते व ३५ रूग्णांनी मात केली होती. तर ३ तारखेला १८९ रूग्ण आढळून आले होते व ३४ रूग्णांनी मात केली होती. म्हणजेच, ३८८ नवे रूग्ण आढळून आले होते व १०१ रूग्णांनी कोरोनावर मात केली होती.
आॅक्टोबर महिन्यातील ३ दिवसांची तुलनात्मक आकडेवारी बघितल्यास, १ तारखेला १०० नवे रूग्ण आढळून आले असून २४८ रूग्णांनी कोरोनावर मात केली. २ तारखेला ७३ नवे रूग्ण आढळून आले असून १६१ रूग्णांनी मात केली तर ३ तारखेला ९६ रूग्ण आढळून आले असून २८२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच, या ३ दिवसांत २६९ नवे रूग्ण आढळून आले असून तब्बल ६९ रूग्ण मात करून कोरोना योद्धा ठरले आहेत. वरील आकडेवारी बघता ऑक्टोबर महिन्यातील सुरूवातीचे ३ दिवस जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरल्याचे दिसत आहे.

३ दिवसांत ७ मृत्यू
ऑक्टोबर महिन्यात कमी रूग्ण व जास्त सुटीचे आकडे देऊन जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र रूग्ण संख्येत या ३ दिवसांनी सप्टेंबर महिन्यालाही मागे टाकले आहे. सप्टेंबर महिन्यात पुढील ३ दिवसांत ६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यातील या ३ दिवसांत ७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची ही संख्या टेन्शन निर्माण करणारी असून यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे.

मृत्यू संख्या मात्र गंभीर विषय
जिल्ह्यातील रूग्ण संख्या कमी होत असून कोरोनावर मात करणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत चालल्याने जिल्हावासीयांचे थोडेफार टेंन्शन कमी झाले आहे. असे असतानाच मात्र जिल्ह्यात आता दररोज २-३ रूग्णांचा जीव जात असल्याने सर्वांच्याच मनात कोठेतरी धडकी भरलेली आहे. सर्वांच्याच घरात लहानगे व वृद्ध आहेत. अशात मृतांची संख्या वाढत चालल्याने सर्वच धसका घेऊन आहेत. आरोग्य यंत्रणेच्या मेहनतीने कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत आहे यात शंका नाही. मात्र आता तेवढीच मेहनत आरोग्य यंत्रणेने गंभीर व अन्य आजार असलेल्या रूग्णांवर घेतल्यास मृत्यू थांबविण्यात त्यांना यश येणार यात शंका नाही.

Web Title: 691 patients became Corona Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.