७०९ शाळा झाल्या प्रगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:15 PM2017-10-29T22:15:33+5:302017-10-29T22:15:50+5:30

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत आतापर्यंत जिल्ह्यातील १०६९ पैकी ७०९ शाळा प्रगत केल्या.

70 9 Schools are progressive | ७०९ शाळा झाल्या प्रगत

७०९ शाळा झाल्या प्रगत

Next
ठळक मुद्दे२५ निकष झाले शिथील : ३६० अप्रगत शाळांचे प्रयत्न सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत आतापर्यंत जिल्ह्यातील १०६९ पैकी ७०९ शाळा प्रगत केल्या. २५ मुद्द्यांच्या निकषांवरून या शाळा प्रगत झाल्याचे ठरविण्यात आले. अप्रगत शाळांची संख्या बरीच असून १४ जुलै २०१७ रोजी आलेल्या नवीन आदेशानुसार उर्वरीत ३६० अप्रगत शाळा प्रगत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देणे ही राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी आहे. अध्ययन संपादणूक सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त न झाल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २२ जून २०१५ रोजी एक शासन निर्णय काढून अप्रगत शाळांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाला कृतीत उतरवून प्रगत शिक्षणात गोंदिया जिल्हा प्रथम असावा यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग काम करीत आहे. शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा माणस बांधला. याची फलश्रृती म्हणजे जिल्ह्यातील ७०९ शाळा प्रगत झाल्या आहेत.
शासनाने शाळा बोलक्या करण्यासाठी २५ निकष ठेवले होते. परंतु शासनाने १४ जुलै २०१७ ला काढलेल्या शासन निर्णयामुळे आता त्या २५ निकषांना शिथील करण्यात आले. मूलभूत क्षमतेत ७५ टक्के गुण व अभ्यासक्रमावर आधारीत ६० टक्के गुण घेणाºया विद्यार्थ्यास प्रगत समजले जाणार आहे.
आधी विद्यार्थी प्रगत, वर्ग प्रगत व शाळा प्रगत केली जात आहे. ज्या शाळेतील ६० टक्के विद्यार्थी प्रगत झाले त्या शाळेला प्रगत समजण्यात येत आहे.

शाळा बोलक्या करण्यावर भर
६ ते १४ वयातील बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, १०० टक्के विद्यार्थी प्रगत करणे, प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, शैक्षणिक साहित्यावर भर, अप्रगत मूलविहीन शाळा करणे, विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्यनावर भर, विद्यार्थ्यांना कृतीद्वारा शिक्षण देणे, कठिण विषयाविषयी आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भिती नाहीसी करणे, शाळा सुंदर करून विद्यार्थ्यांची शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या व सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करणे व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम या उपक्रमातून केले जात आहेत. एकंदरीत सर्व शाळा बोलक्या करण्यावर भर देण्यात आला.


विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी सुलभ व सोप्या पध्दतीचा वापर केला जात आहे. जिल्ह्यातील सर्वच शाळा प्रगत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
-उल्हास नरड
शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प.गोंदिया.

Web Title: 70 9 Schools are progressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.