७० टक्के तरूण व्यसनाधीन

By admin | Published: June 26, 2017 12:18 AM2017-06-26T00:18:59+5:302017-06-26T00:18:59+5:30

कौटुंबिक कलह, ताण, इच्छापूर्तीचा अभाव व वाईट संगत तरूण पिढीची मानसिकता बिघडवत आहे.

70 percent of the young addicted | ७० टक्के तरूण व्यसनाधीन

७० टक्के तरूण व्यसनाधीन

Next

व्यसनाला त्यागतात ४० टक्के लोक : ९० टक्के लोक डिप्रेशनमध्ये
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कौटुंबिक कलह, ताण, इच्छापूर्तीचा अभाव व वाईट संगत तरूण पिढीची मानसिकता बिघडवत आहे. साधारणत: ९० ते ९५ टक्के लोक आजघडीला डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे ते व्यसनाकडे वळत आहेत. गोंदिया जिल्ह्यात तंबाखू, पान-मसाला, दारू व अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या ९५ टक्याच्या घरात आहे. बाहेकर व्यसन मुक्ती केंद्र सन २००० मध्ये सुरू करण्यात आले असून या केंद्रात सन २००१ पासून आतापर्यंत १८४३ लोकांना दाखल करण्यात आले. यातील ४० ते ४५ लोकांनी व्यसन सोडले आहे.
काही वर्षापूर्वी व्यसन हा शब्द मध्यमवर्गीयांपासून दूर होता. आज मध्यमवर्गीयांमध्येही मोठ्या प्रमाणात व्यसन केले जाते. जिल्ह्यात पान खान्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु पानमसाला, तंबाखू व खर्राच्या शौकीनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रेल्वे स्थानकावर कचरा गोळा करणारे तसेच भीख मागणारी बालके सोल्यूशन व पेट्रोलची नशा करतात. व्यसनामुळे बालकांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात व्यसन करणाऱ्यांमध्ये पुरूष वर्गच नव्हे तर उच्च शिक्षित महिला सुद्धा व्यसनाधीन होत आहेत.
शाळा-महाविद्यालयातील बालके व्यसनाधीन होत आहेत. सातव्या वर्गापासून बालके पानमसाला, तंबाखू, खर्रा, बिडी-सिगारेटच्या अधिन होतात. सुरूवातीला आनंद घेण्याच्या नादात ते त्या व्यसनाच्या आहारी जातात. व्यसनासंदर्भात त्यांची जिज्ञासा, दबाव, अनुकरण, प्रयोगशीलता, मनातील भ्रमाला जबाबदार धरले जाते. हे आनुवंशिक कारणही आहे. व्यसनामुळे मानसिकता बिघडते. व्यसनामुळे शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होतात. व्यसनमुक्तीच्या उपचाराबरोबर समूपदेशन करणे गरजेचे आहे. धूम्रपान सोडल्यावर धमनीच्या हृदयरोगाचा धोका ५० टक्याने कमी होतो, असे आरोग्य विभागाच्या विशेषतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मध्यप्रदेश, छत्तीसगड मधून येतात सोल्युशनचे व्यसनी
बाहेकर व्यसन मुक्ती केंद्रानुसार, गोंदिया जिल्ह्यात दारूच्या व्यसनाचे सर्वाधिक लोक आहेत. दारूमुक्त असलेल्या वर्धा जिल्ह्यातील चरसग्रस्त लोक व्यसन सोडण्यासाठी येथे येतात. शेजारच्या छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातून सोल्युशन व गांजाचे व्यसनाधीन लोक येत असतात.
हे आहेत व्यसनांचे प्रकार
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यू.एच.ओ.) लोकांमध्ये ५५ प्रकारचे व्यसन आढळते. यात तंबाखू, गुटखा, खर्रा, बिडी, सिगरेट या व्यतिरिक्त अमली पदार्थात भांग, चरस, अफीम, गांजा, हशीश, मारिजुआन मॉर्फिन, ब्राउन शुगर, गर्द, कोकेन, एल.एस.डी., झोपेच्या गोळ्या, बेंजोडाइजेपिन, ग्लू, रॉकेल, व्हाइटनर, स्टीरॉइड्स, पेट्रोल, सोल्यूशन, आयोडेक्स यांचा समावेश आहे. मध्यप्रदेशच्या बालाघाट व लांजी येथे दारू, गांजा तर वर्धा व नागपूर मध्ये ब्राऊन शुगर, दारू तसेच भंडारा येथे दारू चा उपयोग केला जातो.

Web Title: 70 percent of the young addicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.