मुंबई मॅरेथॉनसाठी ७३ आदिवासी विद्यार्थी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 10:29 PM2018-01-18T22:29:37+5:302018-01-18T22:29:47+5:30
गोंदिया व गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ५२ मुले आणि २१ मुली असे एकूण ७३ आदिवासी विद्यार्थी मुंबई येथे @२१ जानेवारी रोजी होणाºया टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पोलीस विभागाच्या पुढाकाराने ......
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया व गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ५२ मुले आणि २१ मुली असे एकूण ७३ आदिवासी विद्यार्थी मुंबई येथे @२१ जानेवारी रोजी होणाºया टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पोलीस विभागाच्या पुढाकाराने प्रथमच मुंबई येथे मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या ७३ विद्यार्थ्यांच्या चेहºयावर आनंद झळकत होता.
मुंबई येथील मॅरेथॉनमध्ये या हे विद्यार्थी उत्कृष्ट प्रदर्शन करावे यासाठी त्यांना धावण्याच्या स्पर्धेतील कौशल्य व नैपुण्य वृद्धिंगत करण्यासाठी गोंदिया पोलीस मुख्यालय येथे १२ ते १७ जानेवारी या कालावधीत सराव व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. शिबिरादरम्यान विद्यार्थ्याना विशेष आहार देण्यात आला. पोलीस विभागातील खेळाडू, कर्मचारी व क्र ीडा मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांचा कसून सराव घेण्यात आला. त्यानंतर हे विद्यार्थी मुंबई येथे रवाना झाले. त्यापूर्वी गोंदिया पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गोंदिया पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, गडचिरोली पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख उपस्थिती होते. डॉ. भुजबळ यांनी लोकशाही आणि विकासासाठी दौड या उपक्रमाची माहिती दिली. गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये राबविलेल्या सुरक्षा दौड या उपक्रमाची माहिती देवून जिल्ह्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. आदिवासी समाजाचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेल्या कचारगड येथील पारी कुपार लिंगो व माँ काली कंकाली या जिल्ह्यात असलेल्या श्रद्धास्थानाविषयी माहिती दिली.
पोलीस अधिकाऱ्यांकडे व्यवस्थापन
मुंबई मॅराथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या चमूचे मुख्य व्यवस्थापक म्हणून अपर पोलीस अधीक्षक संदीप अटोले हे काम पाहणार आहे. त्यांच्या मदतीला देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक नागेश भाष्कर व इतर ८ पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक व कवायत निर्देशक यांचे पथक व्यवस्थापनासाठी नेमण्यात आले आहे. ही चमू गोंदिया येथून विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईसाठी रवाना झाली. रेल्वेस्टेशनवर चमूला शुभेच्छा देण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
जंगलामध्ये पसरलेला नक्षलवाद आता शहरी भागात पसरत आहे. या नक्षलवादाला चोख प्रतिउत्तर दिले जाईल. गोंदिया व गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल व दुर्गम भागातील विद्यार्थी लोकशाही व विकासासाठी दौड हा संदेश घेऊन मुंबई मॅरेॅथॉन स्पर्धेत सहभागी होत आहे.
- अंकुश शिंदे
पोलीस उपमहानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र
स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपैकी कोणीही आतापर्यंत मुंबई पाहिलेली नाही. ही वस्तुस्थिती असली तरी विद्यार्थ्यांना लोकशाही आणि विकासासाठी दौड हा संदेश घेवून मुंबई मॅराथॉन स्पर्धा जिंकून आपल्या जिल्ह्याचा व राज्याचा नावलौकीक करतील.
- अभिनव देशमुख
पोलीस अधीक्षक गडचिरोली