तांदळाच्या लहान उद्योजकांसाठी ७.३६ कोटींचा प्रकल्प
By admin | Published: January 7, 2016 02:21 AM2016-01-07T02:21:41+5:302016-01-07T02:21:41+5:30
जिल्ह्यातील लहान तांदूळ व्यावसायिकांसाठी एक नवीन योजना राबविण्यात येत आहे.
क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम : राईस मिलर्स ग्रुपला आधुनिक सुविधा
गोंदिया : जिल्ह्यातील लहान तांदूळ व्यावसायिकांसाठी एक नवीन योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत लहान तांदूळ व्यावसायिकांचे ब्रांडिंग केलेले तांदूळ विदेशातही निर्यात केले जावू शकतील. तशा क्वॉलिटीचे तांदूळ निर्माण करण्याचे तंत्रसुद्धा पुरविण्यात येत आहे. यात काही शासकीय अडचणी आहेत. मात्र प्रयत्न सुरू असल्यामुळे हा प्रकल्प मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव व देवरी तालुक्यातील लहान तांदूळ उद्योजकांसाठी ही योजना आहे. सदर तिन्ही तालुके आदिवासीबहुल व नक्षल प्रभावित आहेत. या तिन्ही तालुक्यांत ५० तांदूळ उद्योजक असून त्यांची धान मिलिंग क्षमता केवळ दोन टनपर्यंत सीमीत आहे. आता या सर्व लहान उद्योजकांना एकत्र आणण्यात यश आले आहे. या ५० उद्योजकांसाठी देवरी येथील एमआयडीसीमध्ये पाच एकर जागा निर्धारित करण्यात आली आहे. मात्र ही जागा सध्या या प्रोजेक्टसाठी उपलब्ध झाली नाही.
जागा मिळवून घेण्याच्या प्रयत्नांची पूर्तता मार्च महिन्यापर्यंत होण्याची शक्यता आहे. असे झाले तर देवरीच्या सदर प्रोजेक्टमध्ये दरदिवशी आठ टन तांदळाची प्रोसेसिंग होवू शकेल.
हा लहान तांदूळ व्यावसाईकांच्या गृपसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. या स्किम अंतर्गत शासन ८० टक्के रक्कम देणार असून २० टक्के रक्कम राईस मिसर्लस् यांना गुंतवावी लागणार आहे. (प्रतिनिधी)