जिल्ह्यात ७४ शाळाबाह्य बालके आढळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:34 PM2018-12-12T23:34:41+5:302018-12-12T23:35:07+5:30
जी मुले अजूनही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली नाहीत किंवा जी बालके स्तलांतरित होतात, अशा बालकांचे सर्वेक्षण बालरक्षकांच्या माध्यमातून करण्यात आले. सन २०१८-१९ मध्ये शाळाबाह्य बालकांचे २३ ते २७ नोव्हेंबर या पाच दिवसात अंतिम सर्वेक्षण करण्यात आले.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : जी मुले अजूनही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली नाहीत किंवा जी बालके स्तलांतरित होतात, अशा बालकांचे सर्वेक्षण बालरक्षकांच्या माध्यमातून करण्यात आले. सन २०१८-१९ मध्ये शाळाबाह्य बालकांचे २३ ते २७ नोव्हेंबर या पाच दिवसात अंतिम सर्वेक्षण करण्यात आले. यात ७४ बालके शाळाबाह्य असल्याचे उघडकीस आले आहे.
सन २०१८-१९ मध्ये शाळाबाह्य बालकांचे २३ ते २७ नोव्हेंबर या पाच दिवसात अंतीम सर्वेक्षणात बालरक्षकांनी घरोघरी भेटी दिल्यात. बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजार इत्यादी ठिकाणी फिरून तळागाळातील,झोपडपट्टी, खेडे, गाव, वाडी, पाडे, तांडे, वस्ती, शेतमळे, जंगलात वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले. यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३४ बालके आढळली.
तिरोडा तालुक्यात १५ बालके, आमगाव तालुक्यात ८ बालके, सडक-अर्जुनी ७ बालके, सालेकसा ६ बालके, अर्जुनी-मोरगाव व गोरेगाव या तालुक्यात प्रत्येकी दोन बालके आढळलीत. देवरी तालुक्यात एकही बालक शाळाबाह्य आढळला नाही. शासन निर्णय २० मे २०१५ अन्वये ६ ते १८ वर्ष वयोगटातील शाळेत न जाणारी व सतत ३० दिवसापेक्षा अधिक गैरहजर राहणाºया बालकांचे सर्वेक्षण करण्यात येते. दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला जातो. सर्वेक्षणाची कार्यपध्दती योग्यरित्या करण्यासाठी तालुका व गावपातळीवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत.
९ जानेवारी २०१७ अन्वये बालरक्षक ही संकल्पना पुढे आणली. जिह्यात समता लिंक पुणे व जिल्ह्याच्या लिंकमध्ये ४५८ बालरक्षकांची नोंदणी केली आहे. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची दखल घेण्यात आली.
२४ बालकांनी शाळाच पाहिली नाही
गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने केलेल्या अंतीम सर्वेक्षणात उत्तम कामगीरी केली. पाच दिवस केलेल्या सर्वेक्षणात पकडलेल्या ७४ बालकांपैकी २४ बालके अशी आढळली की ते कधीच शाळेत गेले नव्हते. त्यात १७ मुले व ७ मुलींचा समावेश आहे. अशी आमगाव तालुक्यात २, गोंदिया १८ व सालेकसात चार बालके आढळली.
३० दिवसापेक्षा अधिक गैरहजर ५० बालके
ज्या निकषाच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ३० दिवस ंिकंवा त्यापेक्षा अधिक दिवस गैरहजर असणाºया बालकांची संख्या ५० आहे. त्यात २५ मुले व २५ मुलींचा समावेश आहे. आमगाव ६, अर्जुनी-मोरगाव २, गोंदिया १६, गोेरेगाव २, सडक-अर्जुनी ७, सालेकसा २ व तिरोडा १५ अशा ५० बालकांचा समावेश आहे.
सर्वेक्षणानंतर एकही विद्यार्थी शाळाबाह्य आढळला तर त्याची जबाबदारी शिक्षक केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची राहील, असा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे बालरक्षकांनी व इतर शिक्षकांनी उत्तम कामगीरी करून शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले.
-रमेश अंबुले
शिक्षण सभापती जि.प. गोंदिया.