जिल्ह्यातील ७५ हजार कुटुंब झाली धूरमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:32 AM2018-12-29T00:32:43+5:302018-12-29T00:36:37+5:30
धूरमुक्त जिल्हा व महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. यातंर्गत जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले असून यापैकी ८२ टक्के लाभार्थी गॅस सिलिंडरचा नियमित वापर करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : धूरमुक्त जिल्हा व महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. यातंर्गत जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले असून यापैकी ८२ टक्के लाभार्थी गॅस सिलिंडरचा नियमित वापर करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंब धूर मुक्त झाले आहे.
प्रत्येक कुटुंबाचे स्वयंपाक घर धूर मुक्त व्हावे, गरीब महिलांना स्वयंपाक करताना त्रास होवू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना २०१६ पासून सुरू केली. या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कुटुंब, अंत्योदय, अन्नपुर्णा योजनेचे लाभार्थी, जंगल प्रभावित कुटुंब, अति मागासप्रवर्ग, नदीकाठालगतचे कुटुंब यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी इंधनाची समस्या निर्माण होते. तसेच यासाठी वृक्षतोड देखील मोठ्या प्रमाणात होत होती. पर्यावरणाचा ºहास आणि प्रदूषणात सुध्दा वाढ होत होती. स्वयंपाक करताना होणाऱ्या धुरामुळे महिलांमध्ये श्वसनाच्या आजारात वाढ झाली होती. हे टाळण्यासाठी व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत तिन्ही मुख्य गॅस वितरण कंपन्याकडून गोंदिया जिल्ह्यात एकूण ७५ हजार ६७० कुटुंबांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील गॅस सिलिंडरचा वापर करणाºयांची टक्केवारी ८९.५ टक्के झाली आहे.
या योजनेमुळे ३४.४ टक्के गॅस सिलिंडरचा वापर करणाºयांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी ८२ टक्के कुटुंब नियिमित गॅस सिलिंडर भरुन त्याचा वापर करीत असल्याचा दावा हिंदुस्थान पेट्रोलियमचे जिल्हा नोडल अधिकारी आदित्य टांक यांनी केला. लाभार्थ्यांना या योजनेतंर्गत अनुदानावर गॅस कनेक्शन दिले जात आहे. गॅस कनेक्शनची रक्कम सिलिंडरवर दिल्या जाणाºया अनुदानात कपात केली जात होती. मात्र यामुळे गॅस सिलिंडरची उचल करणाºया ग्राहकांची संख्या कमी झाली होती.
त्यामुळे या योजनेचा मुख्य उद्देश साध्य होत नव्हता. यासाठी शासनाने लाभार्थ्याना गॅस कनेक्शन दिल्यानंतर सुरूवातीचे सहा महिने कनेक्शनची रक्कम कपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गॅस सिलिंडरची नियमित उचल करुन वापर करणाºयांची संख्या वाढली असून जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंब धूर मुक्त झाल्याचे चित्र आहे.
राज्यात पाच कोटी गॅस कनेक्शन वाटपाचे उद्दिष्ट
उज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यात मार्च २०१९ पर्यंत दारिद्र्यरेषेखालील ५ कोटी कुटुंबांना घरगुती गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तर यात टप्प्या टप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. राज्यात १८ डिसेंबरपर्यंत १ कोटी ५६ लाख लाभार्थ्यांना या योजनेतंर्गत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले आहे.
धूरमुक्त जिल्हा आणि महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी उज्ज्वला योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंब धूर मुक्त झाली आहे. लाभार्थ्यांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
- आदित्य टांक, जिल्हा नोडल अधिकारी हिदुस्थान पेट्रोलियम.