अहिंसा मॅरेथानमध्ये ७६२० स्पर्धक धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:28 PM2018-10-01T21:28:22+5:302018-10-01T21:28:54+5:30
जिल्ह्यातील तरूणांना खेळासंदर्भात जागृत करण्यासाठी पोलीस विभागातर्फे एक पाऊल उचलण्यात आले. २ आॅक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या अहिंसा मॅरेथान स्पर्धेत धावण्यासाठी ७ हजार ६२० स्पर्धकांनी आपले नाव पोलीस विभागाकडे नोंदविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील तरूणांना खेळासंदर्भात जागृत करण्यासाठी पोलीस विभागातर्फे एक पाऊल उचलण्यात आले. २ आॅक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या अहिंसा मॅरेथान स्पर्धेत धावण्यासाठी ७ हजार ६२० स्पर्धकांनी आपले नाव पोलीस विभागाकडे नोंदविले आहे.
या स्पर्धेत २ हजार १५० महिला भाग घेणार आहेत. कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरून आमगाव किडंगीपार रेल्वे क्रॉसिंगपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांना परत मुख्यालयापर्यंत परत यावे लागेल. ६ किमी, २१.०९७ किमीचे अर्ध मॅरेथान व ४२.१९५ किमीचे पूर्ण मॅरेथान आयोजित करण्यात आले आहे.
६ किमीच्या स्पर्धेत ३ हजार ५७० पुरूष व १ हजार ६७७ महिला सहभागी होतील. अर्ध मॅरेथानमध्ये १ हजार ७२९ पुरूष व ४३९ महिला तर पूर्ण मॅरेथानमध्ये १७१ पुरूष व ३४ महिलांनी भाग घेतला आहे. ४२ किमी स्पर्धेत वेळेच्या आत येणाऱ्या सर्व स्पर्धकांना मुंबईच्या मॅरेथान स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे.ज्या स्पर्धकाचे वय १८ व त्यापेक्षा अधिक असेल त्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. २९ सप्टेंबरपर्यंत गोंदिया शहर पोलीस ठाण्यात ३३२ स्पर्धकांनी नोंदणी केली.
रामनगर ६००, गोंदिया ग्रामीण ३४६, रावणवाडी ६७२, तिरोडा ४४९, गंगाझरीत २५२, दवनीवाडात ५८७, आमगावात ७३४, गोरेगावात ६५१, सालेकसात ७८९, देवरीत ६०७, चिचगडमध्ये १७०, डुग्गीपारमध्ये ६२७, नवेगावबांध १४९, केशोरीत १४२, अर्जुनी-मोरगावात ५१३ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मॅरेथानच्या खेळाडू मोनिका आथरे उपस्थित राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी सांगितले.
गोंदिया-आमगाव रस्ता १२ वाजेपर्यंत बंद
आॅक्टोबर रोजी सकाळी ४ ते दुपारी १२ वाजता दरम्यान गोंदिया-आमगाव रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे.अत्यावश्यक सेवेसाठी या रस्त्याचा वापर होऊ शकतो. स्पर्धकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. पाण्याचे बॉटल ठिकठिकाणी उपलब्ध करून ठेवल्या जातील. रूग्णवाहीका देखील तयार राहणार आहे.बॉक्स४१३ अधिकारी-कर्मचाºयांचा बंदोबस्तअहिंसा मॅरेथान स्पर्धेसाठी ३५३ पुरूष व ६० महिला अश्या ४१३ पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत. जिल्हाभरातील पोलीस ठाण्यातून पोलीस कर्मचारी मागविण्यात आले आहेत. स्ट्रायकींग फोर्स, घातपात विरोधी पथक, व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे.