शैक्षणिक धोरणावरील कार्यशाळेत ७६५३ जणांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:21 AM2021-01-10T04:21:45+5:302021-01-10T04:21:45+5:30
सर्व शिक्षण यंत्रणेतील अधिकारी, पर्यवेक्षीय यंत्रणा, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याविषयी विस्तृत माहिती ...
सर्व शिक्षण यंत्रणेतील अधिकारी, पर्यवेक्षीय यंत्रणा, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याविषयी विस्तृत माहिती व्हावी, याकरिता सदर वेबिनारचे आयोजन केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांच्या हस्ते वेबिनारचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एनसीईआरटी, आरआयईचे प्राचार्य नित्यानंद प्रधान, प्राचार्य डॉ. नेहा बेलसरे, डायट प्राचार्य राजेश रुद्रकार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कच्छवे उपस्थित होते. या वेबिनारला राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक म्हणून प्रो. नित्यानंद प्रधान, प्रो. एल. के. तिवारी, प्रो. आय. बी. चुगताई, डॉ. एन. सी. ओझा, डॉ. संजयकुमार पंडागडे, डॉ. सौरभ कुमार यांनी मार्गदर्शन केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० वेबिनारला जिल्ह्यातील शिक्षण पर्यवेक्षकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व साधनव्यक्ती, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षणप्रेमी, शिक्षणतज्ज्ञ असे एकूण ७ हजार ६५३ व्यक्तींनी वेबिनारचा लाभ घेतला. या वेबिनारच्या यशस्वितेसाठी वेबिनार जिल्हा समन्वयक अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, अधिव्याख्याता डॉ. प्रदीप नाकतोडे, भाऊराव राठोड, योगेश्वरी नाडे, विषय सहायक सुनील हरिणखेडे, सुभाष मारवाडे, गौतम बांते, संदीप सोमवंशी, मिलिंद रंगारी, दिलीप नवखरे, मुकेश रहांगडाले, शालीक कठाने, दिलीप रामटेके, विलास मलवार, खंडेलवाल, गौतम बांते यांनी सहकार्य केले.