७७६ हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:06 AM2019-01-05T00:06:48+5:302019-01-05T00:07:35+5:30
तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आल्यास परिसरातील शेतकरी सुलाम सुफलाम होतील याच उद्देशाने आ.विजय रहांगडाले यांनी शासनाकडून जलसंधारणाच्या कामासाठी निधी खेचून आणला. त्यामुळे ७७६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आल्यास परिसरातील शेतकरी सुलाम सुफलाम होतील याच उद्देशाने आ.विजय रहांगडाले यांनी शासनाकडून जलसंधारणाच्या कामासाठी निधी खेचून आणला. त्यामुळे ७७६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे.
धापेवाडा उपसा सिंचन योजना, लघू पाटबंधारे तलाव, कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती व नाला सिमेंटीकरणाकरिता १६ गावांसाठी २ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला असून यामुळे ७७६ हेक्टर जमिन सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने केसलवाडा येथील साठवण बंधारा दुरुस्तीकरिता १८.४९ लाख, खेडेपार येथील बंधारा दुरुस्तीकरिता ३.२० लाख, कुल्पा बंधारा दुरुस्ती ५.९९ लाख, लेदडा बंधारा दुरुस्ती ३.१९ लाख, मनोरा बंधारा दुरुस्ती ५.४७ लाख, मुरपार बंधारा दुरुस्ती ६.४७ लाख, सिल्ली लपा तलाव दुरुस्ती १५.२५ लाख, सोनेखारी बंधारा दुरुस्ती ९.१८ लाख, मुंडीकोटा कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती ५.६१ लाख, साठवण बंधारा दुरुस्ती १३.५९ लाख, लपा तलाव दुरुस्ती १५.२७ लाख, सिमेंटनाला बांधकाम ६.२८ लाख, खुरखुडी कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती ४.९९ लाख, साठवण बंधारा दुरुस्ती २.६८ लाख, बोदा लपा तलाव दुरुस्ती ५५.४१ लाख, साठवण बंधारा दुरुस्ती ६.७६ लाख, बिहरिया येथील साठवण बंधारा दुरुस्तीकरिता १०.८९ लाख, मामा तलाव दुरुस्ती ६.५० लाख, किंडगीपार साठवण बंधारा दुरुस्ती १८.०३ लाख, सिमेंटनाला बांधकाम ९.७१ लाख, भुराटोला साठवण बंधारा दुरुस्ती ३.२५ लाख, डोंगरगाव (ख.) साठवण बंधारा दुरुस्ती २.९० लाख, शासनातर्फे मंज़ूर करण्यात आला असून यामुळे ७७६.२७ हेक्टर जमिन सिंचनाखाली येवून १२१७.५० दलघमी जलसाठा निर्माण होणार आहे.