दोन दिवसांत ८०० गाड्यांची विक्री

By admin | Published: April 1, 2017 02:34 AM2017-04-01T02:34:31+5:302017-04-01T02:34:31+5:30

सर्वोच्च न्यायालयाने प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएस-थ्री वाहनांना १ एप्रिल २०१७ पासून नोंदणी करण्यास मनाई केली.

800 vehicles sold in two days | दोन दिवसांत ८०० गाड्यांची विक्री

दोन दिवसांत ८०० गाड्यांची विक्री

Next

शोरूममधील स्टॉक संपला : वाहने घेण्यासाठी नागपूरकडे धाव
गोंदिया : सर्वोच्च न्यायालयाने प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएस-थ्री वाहनांना १ एप्रिल २०१७ पासून नोंदणी करण्यास मनाई केली. राष्ट्रीय रस्ते व महामार्ग परिवहन मंत्रालयाने वाहन तयार करणाऱ्या कंपन्यांना तशी नोटीस बजावली. या नोटीसचा धसका घेत सर्व कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेला जुन्या वाहनांची तत्काळ विक्री करण्यासाठी मोठी सवलत जाहीर केली. परिणामी दोन दिवसात गोंदियातील तीन खरेदी केलेल्या ८०० मोटार सायकलींची विक्री झाली. त्यांच्या नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयात एकच गर्दी झाली होती.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी १ एप्रिल २०१७ पासून बीएस-फोर या वायुप्रदुषणविषयक मानकाची पूर्तता न करणाऱ्या कोणत्याहीे प्रकारची वाहने म्हणजेच दुचाकी, तीन चाकी, चार चाकी किंवा व्यापारी वाहनांची विक्री वाहन उत्पादक व विक्रेत्यांना करता येणार नाही. १ एप्रिल २०१७ पासून या वाहनांची नोंदणीच होणार नाही, असे ठरविल्याने वाहन विक्री करणाऱ्यांनी त्या अवधीत सवलतीच्या दरात वाहने विक्री केली. सवलत पाहून लोकांनीही मोठ्या प्रमाणात वाहने खरेदी केली. शुक्रवारी रात्रीपर्यंत या वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरुच होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत होती. (तालुका प्रतिनिधी)

विक्रेत्यांकडून उद्देशाला बगल
पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून सर्वोच्च न्यायालयाने बीएस-थ्री या वाहनांना नोंदणी करण्यास बंदी घातली. परंतु या वाहनांचे उत्पादक व विक्रेत्यांनी चलाकी करुन त्या वाहनांना सवलतीच्या दरात विक्री करुन दोन दिवसात गोंदियासारख्या शहरात ८०० वाहनांची विक्री केली. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या वाहनांना बंदी घालण्यात आली. परंतु एकाच दिवसात नोंदणी झालेली ही वाहने रस्त्यावर तर धावणारच आहेत.
परिवहन कार्यालयात एकच गर्दी
वाहनधारकांनी खरेदी केलेली वाहने ३१ मार्चच्या आत नोंदणी करणेही गरजेचे होते. त्यामुळे दि.३० व ३१ ला परिवहन कार्यालयात एकच गर्दी झाली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही रात्रीपर्यंत कार्यालय सुरू ठेवून नोंदणीसाठी शक्य ते सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वाहनधारकांशी कर्मचाऱ्यांची बाचाबाची होत असल्याचे चित्र दिसले. शुक्रवारी रात्रीही नोंदणीचे काम सुरू होते.

Web Title: 800 vehicles sold in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.