कोरोनाकाळात जिल्ह्यात ८३ मुली बेपत्ता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:30 AM2021-09-19T04:30:25+5:302021-09-19T04:30:25+5:30

नरेश रहिले गोंदिया : कोरोना काळात गोंदिया जिल्ह्यातील ८३ मुली बेपत्ता झाल्या. सन २०२० मध्ये २ मुले ३९ मुली ...

83 girls go missing in Corona district | कोरोनाकाळात जिल्ह्यात ८३ मुली बेपत्ता !

कोरोनाकाळात जिल्ह्यात ८३ मुली बेपत्ता !

Next

नरेश रहिले

गोंदिया : कोरोना काळात गोंदिया जिल्ह्यातील ८३ मुली बेपत्ता झाल्या. सन २०२० मध्ये २ मुले ३९ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी २ मुले व ३७ मुलींचा शोध घेण्यात आला. परंतु २ मुलींचा शोध अद्याप लागला नाही. सन २०२१ मध्ये ७ मुले व ४४ मुली बेपत्ता झाल्या. यापैकी ५ मुले व ३१ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले तर २ मुले व १३ मुली अद्यापही सापडले नाहीत. कोरोनाच्या काळात फरार झालेल्या ८३ मुलींपैकी ऑपरेशन मुस्कानने ६८ मुलींचा शोध घेण्यात आला. परंतु १५ मुली अजूनही बेपत्ता आहेत. तर दोन अल्पवयीन मुलेही बेपत्ता आहेत.

....................

८२ टक्के मुलींचा शोध

गोंदिया जिल्ह्यातून पळून गेलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या मुलींपैकी ८१.९२ टक्के मुलींचा शोध लागला असून त्या आपल्या घरी परतल्या आहेत. तर १८ टक्के मुली अजूनही बेपत्ता आहेत. शासनाने राबविलेल्या ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातूनच मुलींना शोधण्यात यश आले आहे.

.............

जिल्ह्यातील एकूण बेपत्ता -१९

मुले-०२

मुली-१७

.............

वाढत चालली विधीसंघर्षीत बालकांची संख्या

गोंदिया शहर दोन पोलीस ठाण्यात विभागला गेला आहे. रामनगर व गोंदिया शहर या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे १८ वर्षाखालील बालके, चोरी, दरोडे, मारामाऱ्या, विनयभंग, खून अशा गंभीर गुन्ह्यात अडकले आहेत. अल्पवयीन बालकांना योग्य संस्कार न मिळाल्याने मित्रांच्या मदतीने ते गंभीर गुन्ह्यात शिरकाव करीत आहेत.

...........

२०२० मध्ये ५० बलात्कार

खून-३३

खुनाचा प्रयत्न-१४

हयगयीने मृत्यू-१३१

दरोडा-२

जबरी चोरी-८

घरफोडी-८०

धोकेबाजी-३०

पळवून नेणे-४०

सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला-१५

बलात्कार-५०

विनयभंग-८४

Web Title: 83 girls go missing in Corona district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.