गारपिटीमुळे ८३ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:00 AM2020-02-28T06:00:00+5:302020-02-28T06:00:06+5:30

सोमवारी (दि.२५) गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सर्वाधिक कौलारुंच्या घराचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडाल्याने व घरे आणि गोठ्यांवर झाडांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याचा सर्वाधिक फटका सालेकसा, सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव तालुक्याला बसला आहे.

83 lakh loss due to hailstorm | गारपिटीमुळे ८३ लाखांचे नुकसान

गारपिटीमुळे ८३ लाखांचे नुकसान

Next
ठळक मुद्दे१६०९ घरांची पडझड : महसूल विभागाचे सर्वेक्षणातील माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात २५ फेब्रुवारीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांसह मालमत्तेचे सुध्दा नुकसान झाले. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे एकूण १६०९ घरे आणि गोठ्यांची पडझड होऊन ८३ लाख ४२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला असून शासनाकडून आपदग्रस्तांना किती नुकसान भरपाई दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.
सोमवारी (दि.२५) गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सर्वाधिक कौलारुंच्या घराचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडाल्याने व घरे आणि गोठ्यांवर झाडांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याचा सर्वाधिक फटका सालेकसा, सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव तालुक्याला बसला आहे. आमगाव तालुक्यात ४१ घरे आणि गोठ्यांची, सालेकसा तालुक्यात १४८० घरे आणि गोठे,सडक अर्जुनी तालुक्यात ६२ घर आणि गोठे व गोंदिया तालुक्यात १३ आणि तिरोडा तालुक्यात ४ घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. यामुळे ८३ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले.
सदर नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्या यंत्रणेतंर्गत करण्यात आले.तसेच या नुकसानीचा अहवाल गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे. शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर होईपर्यंत नुकसानग्रस्तांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अवकाळी पावसामुळे ९७४ हेक्टरमधील पिके बाधित
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना व भाजीपाल्याला बसला. जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविलेल्या अहवालात ९७४ हेक्टरमधील पिके बाधीत झाले आहे. यात २७२ हेक्टरचे ३३ टक्केच्या आत तर ७०२ हेक्टरचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. या नुकसानीत अजुन वाढ होण्याची शक्यता महसूल विभागाने वर्तविली आहे. दरम्यान हा सर्व अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
पीक विम्या कंपन्याकडे नजरा
जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक क्षेत्र धानाचे असून त्या पाठोपाठ गहू आणि हरभरा या पिकांचे आहे. बºयाच शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत रब्बी पिकांचा विमा उतरविला होता. त्यामुळे ३३ टक्केच्यावर ७०२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून पीक विमा कंपन्या आता शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी नेमका कोणता निकष लावतात. याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: 83 lakh loss due to hailstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.