काँग्रेसचा १३४ वा स्थापन दिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 05:00 AM2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:14+5:30

देवरी येथे आमदार सहषराम कोरोटे यांच्या निवासस्थानी स्थापना दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम राष्ट्रीपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पतंप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष राधेशाम बगडीया हे होते.

The 8th Founding Day of the Congress was exciting | काँग्रेसचा १३४ वा स्थापन दिवस उत्साहात

काँग्रेसचा १३४ वा स्थापन दिवस उत्साहात

Next

न्यूज नेटवर्क
देवरी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३४ वा स्थापना दिवस देवरी,आमगाव शहारासह ठिकठिकाणी शनिवारी (दि.२८) उत्साहात साजरा करण्यात आला.
देवरी येथे आमदार सहषराम कोरोटे यांच्या निवासस्थानी स्थापना दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम राष्टÑपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पतंप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष राधेशाम बगडीया हे होते.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष संदीप भाटीया, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उषा शहारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शकील कुरेशी, महिला काँग्रेसच्या पुष्पा उदापुरे, काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते डॉ.अनिल चौरागडे, तालुका महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, युवक काँग्रेसचे राजेश गहाणे, नितीन उईके,संजय बळगाये, जयपाल प्रधान, किरसान, आकेश उईके, अविनाश टेंभरे, अमित तरजुले यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप भाटीया यांनी मांडले. संचालन प्रशांत कोटांगले केले तर उपस्थितांचे आभार कमलेश पालीवाल यांनी मानले.
आमगाव
देवरी मार्गावरील आ. सहषराम कोरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमगाव तालुका काँग्रेसचे महासचिव इसुलाल भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रविदत्त अग्रवाल, माजी पं.स. सदस्य हुकुमचंद बहेकार, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजकुमार फुंडे, गोंदिया जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष बंसीधर अग्रवाल, जमीन खान, संजय बहेकार, बाबा मिश्रा, राजकुमार मोदी, संपत सोनी, प्रभादेवी उपराडे, रामेश्वर शामकुवर, रामदास गायधने, दिपक शर्मा, नरेश बोपचे, संतोष गुप्ता, तारेंद्र रामटेके, आनंद शेंडे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासचिव इसुलाल भालेकर यांनी मांडले. संचालन व आभार महेश उके यांनी मानले.

Web Title: The 8th Founding Day of the Congress was exciting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.