जिल्ह्यात ९२ मिमी पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 09:25 PM2019-06-16T21:25:38+5:302019-06-16T21:26:14+5:30

मृग नक्षत्र लागून आता वर ७ सात दिवस होवूनही पाऊस बरसला नव्हता. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघता १४ जून पर्यंत सरासरी ९२ मिमी पाऊस पडायला हवा होता. यंदा मात्र फक्त ०.७८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

9 2 mm rain deficit in the district | जिल्ह्यात ९२ मिमी पावसाची तूट

जिल्ह्यात ९२ मिमी पावसाची तूट

Next
ठळक मुद्दे१४ तारखेपर्यंतचा अंदाजित पाऊस : यंदा फक्त ०.७८ मिमी नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मृग नक्षत्र लागून आता वर ७ सात दिवस होवूनही पाऊस बरसला नव्हता. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघता १४ जून पर्यंत सरासरी ९२ मिमी पाऊस पडायला हवा होता. यंदा मात्र फक्त ०.७८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजेच, यंदा जिल्ह्यात पावसाळ््याच्या सुरूवातीलाच ९२ मिमी पावसाची तूट दिसून येत आहे.
मागील काही वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत असून मृग नक्षत्र लागूनही बरसण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. यंदाही पावसाने हुलकावणी दिली असून मृग नक्षत्र लागूनबी शुक्रवारपर्यंत (दि.१४) हजेरी लावलेली नव्हती. परिणामी उकाड्यामुळे सर्वच हैरान असताना पाणी टंचाई अधिकाधिक गंभीर होत असून सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. कधी पाऊस बरसतो व उकाडा आणि पाणी टंचाईपासून सुटका होते याची आस लावून सर्वच बसले आहेत. अशात शनिवारी (दि.१५) दुपारी पावसाने हजेरी लावली.
तरिही जिल्ह्यातील पर्जन्याची स्थिती बघता १४ जून पर्यंत जिल्ह्यात ९२ मीमी एवढा पाऊस होणे अपेक्षीत आहे. यंदा मात्र जिल्ह्यात फक्त ०.७८ मीमी एवढ्याच पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यावरून जिल्ह्यात यंदा ९२ मीमी पावसाची तूट सुरूवातीलाच दिसून येत आहे. अशीच स्थिती असल्यास येणारा काळ कठीण दिसून येत आहे. एकीकडे उकाड्याने सर्वांनाच हैरान करून ठेवले आहे. त्यात पाऊस बरसत नसल्याने प्रकल्प व तलावांतील पाणीसाठा घटत चालला असून पाणी टंचाई अधिक गंभीर होत चालली आहे.
त्यामुळे लवकरात लवकर पाणी बरसणे गरजेचे झाले आहे. असे न झाल्यास उकाड्यापासून सुटका होणे कठीणच दिसत आहे. शिवाय पाणी टंचाईचा फटका बसत असल्याने नागरिकांची फसगत होत आहे. यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून धो-धो बरसावा अशी प्रार्थना जिल्हावासी करीत आहेत.

Web Title: 9 2 mm rain deficit in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस