९३३४ आपादग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा
By admin | Published: January 17, 2017 12:53 AM2017-01-17T00:53:06+5:302017-01-17T00:53:06+5:30
सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे ८ हजार ६५ घरे आणि १ हजार २६४ गोठ्यांचे नुकसान झाले.
नैसर्गिक आपत्ती : २ कोटी ७० लाख २१ हजारांची मागणी
गोंदिया : सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे ८ हजार ६५ घरे आणि १ हजार २६४ गोठ्यांचे नुकसान झाले. मागच्या वर्षीच्या शिल्लक अनुदानातून अतिगरजूंना शक्य ती मदत करण्यात आली, परंतु उर्वरित आपादग्रस्तांना २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रुपयांच्या मदतीची प्रतीक्षा आहे.
वादळ, पूर यामुळे घर, गोठे, पशूधन, रस्ते, शाळा, चावडी यासह जीवित हाणीही झाली आहे. यातील आपादग्रस्तांना, त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाते. सन २०१६-१७ या वर्षात नैसर्गिक आपत्तीत ८ हजार ६५ घरांचे, १ हजार २६४ गोठ्यांचे नुकसान झाले. शासनाच्या नियमानुसार हे नुकसान २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रुपयांचे आहे.
गोंदिया तालुक्यात ३ हजार २५६ घरांचे नुकसान झाले असून १ कोटी ३५ लाख ३ हजार ३५० रुपयाचे नुकसान झाले. तिरोडा तालुक्यातील ९८६ घरे तर ११४ गोठे असे ३३ लाख ९४ हजार ६०० रुपयाचे नुकसान झाले.
गोरेगाव तालुक्यातील १ हजार १०७ घरे व ५८ गोठ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीची किंमत ३१ लाख ६० हजार ५० रुपये आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १ हजार ८१८ घरे तर २० गोठ्यांचे नुकसान झाले असून त्या नुकसानीची किंमत २१ लाख १५ हजार ७५० रुपये, देवरी तालुक्यातील ३० घरे व ७ गोठ्यांचे १ लाख २ हजार ३०० रुपयाचे नुकसान झाले.
आमगाव तालुक्यातील ५८२ घरे व १ हजार ५६ गोठ्यांचे ४० लाख ८० हजाराचे नुकसान झाले. सालेकसा तालुक्यातील १५३ घरे ४ गोठे असे २ लाख ९४ हजार ३०० रुपयाचे नुकसान झाले.
सडक-अर्जुनी तालुक्यातील १३३ घरे १० गोठे असे ३ लाख ७१ हजार १५० रुपयाचे नुकसान झाले. या नुकसानीचा आकडा २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रुपयाचा घरात गेलेला आहे.
नुकसानग्रस्तांना मदतीसाठी शासनाकडे मागणी करण्यात आली. परंतु शासनाने सदर मदतीच्या रकमेचा पुरवठा केला नाही. (तालुका प्रतिनिधी)
एक कोटीची मदत
आपादग्रस्तांना जिल्हा प्रशासनाने जुन्या शिल्लक रकमेपैकी १ कोेटी २ लाख ८२ हजार २९७ रुपयांची मदत केली आहे. मृत व्यक्तीच्या व जखमींच्या कुटूंबीयांना मदत देण्यासाठी असलेल्या ३५ लाखापैकी १५ लाख ८२ हजार ५९७ रुपये वाटप करण्यात आले. घर, गोठे दुरूस्तीसाठी असलेल्या ४० लाखापैकी ३९ लाख ५३ हजार २०० रुपये वाटप करण्यात आले. पशुधन खरेदीसाठी ८ लाखापैकी १२ लाख १३ हजार ६०० रुपये देण्यात आले. अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी २ लाखापैकी एकही खर्च झाले नाही. इतर बाबीसाठी ४५ हजार रुपये आले होते. परंतु ३५ लाख ३२ लाख ९०० रुपये खर्च करण्यात आले. आवकपेक्षा अधिक खर्च ज्या शिर्षकाखाली खर्च करण्यात आला, ती रक्कम इतर शिर्षलेखातून घेण्यात आली आहे.