सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची ९ पदे रिक्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:49 AM2017-07-18T00:49:50+5:302017-07-18T00:49:50+5:30
जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमध्ये सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची (एएलडीओ) नऊ पदे भरली आहेत.
अतिरिक्त ठरविले : पद समाप्त करण्याचे शासनाचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमध्ये सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची (एएलडीओ) नऊ पदे भरली आहेत. या अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती किंवा जिल्ह्याबाहेर इतर ठिकाणी त्यांचे स्थानांतरण करण्यात आले तर हे पद समाप्त करण्यात येतील.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीची एक सभा शनिवार (दि.१५) पार पडली. यात जि.प. सदस्य मनोज डोंगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उचलले. त्यांचे म्हणणे आहे की, १३ मंजूर पदांपैकी केवळ नऊ पदे सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांचे भरले आहेत. चार पदे रिक्त आहेत.
तसेच जिल्हा परिषदेच्या विविध पशु वैद्यकीय रूग्णालयात पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २२ पदे रिक्त आहेत. उर्वरित २२ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी नऊ अधिकाऱ्यांचे स्थानांतर इतर ठिकाणी झालेले आहे. या प्रकरणात जिल्हा प्रशासन निष्काळजीपणा दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
देवरी येथे एक मोबाईल पशु दवाखाना आहे. तेथील पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचेसुद्धा स्थानांतरण झालेला आहे.
परंतु सदर अधिकारी स्थानांतरण झालेल्या ठिकाणी न जात लांब सुट्टीवर गेलेले आहेत. जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये कार्यरत सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या सर्व नऊ पदांना शासनाने निरस्त केले आहे. ही पदे अतिरिक्त ठरविण्यात आली आहेत. भविष्यात ही पदे कमी केले जातील.
जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये कार्यरत सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांचे नऊ पद अतिरिक्त आहेत. या पदांना राज्य शासनाने समाप्त केले आहे. परंतु ही पदे समाप्त करण्यापूर्वीच पदोन्नतीने सदर पद भरण्यात आले होते. जेव्हापर्यंत या पदांवर सदर अधिकारी कार्यरत आहेत तेव्हापर्यंत त्या पदांना ठेवण्यात येईल. ही पदे खाली होताच त्यांना निरस्त करण्यात येईल.
-डॉ.राजेश वासनिक,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.गोंदिया