९२ हजार विद्यार्थ्यांना नवीन गणवेश

By admin | Published: August 18, 2015 01:51 AM2015-08-18T01:51:33+5:302015-08-18T01:51:33+5:30

गोंदिया जिल्ह्यातील ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांना यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात गणवेश वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील

92,000 new uniforms for students | ९२ हजार विद्यार्थ्यांना नवीन गणवेश

९२ हजार विद्यार्थ्यांना नवीन गणवेश

Next

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांना यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात गणवेश वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी स्वातंत्र्यदिनी (१५ आॅगस्ट) शाळेत गणवेशात हजर झाले. शासनाने उशिरा निधी उपलब्ध करून दिल्याने शाळेच्या पहिल्या दिवशीपासून गणवेश मिळू शकले नसले तरी सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनापूर्वी गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.
गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी शासनाने ३ कोटी २६ लाख २५ हजार ६०० रूपये पाठविले होते. ते पैसे सर्व तालुक्यांच्या संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना २५ जून रोजी देण्यात आले. ३० जुलैपर्यंत प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्याला गणवेश द्यावेत, असे निर्देश २७ जुलै रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. परंतु तरीही विद्यार्थ्याना गणवेश मिळाले नाही अशा तक्रारी येताच ३१ जुलै रोजी शिक्षण विभागाने पुन्हा पत्र काढून त्वरित गणवेश वाटप करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे गणवेश तयार करण्याच्या प्रक्रियेला गती आली.
१५ आॅगस्टच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थी गणवेशात होता. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच गणवेश मिळावे यासाठी शासनाने दोन महिन्याआधीच गणवेशाची रक्कम देणे अपेक्षित आहे. परंतु शासनाकडून योग्यवेळी गणवेशाची रक्कम मिळाली नाही. शाळा सुरू होण्याच्या दोन महिन्याअगोदर पैसे पाठविले तर कापडाचे दरपत्रक मागवून त्यानुसार पुढील प्रक्रिया करणे सोपे होते. कमीत कमी तीन दरपत्रक येणे गरजेचे असते. दरपत्रकानंतर पुरवठा आदेश काढावा लागते. त्यानंतर ते कापड शिवण्यासाठी पुन्हा तीच प्रक्रिया करावी लागते. पहिल्या दिवशी मिळाले नाही तरी निदान स्वातंत्र्यदिन गणवेशात साजरा करता आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

या विद्यार्थ्यांना
दिले गणवेश
४जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन गणवेश दिले जातात. याशिवाय सर्व शालेय विद्यार्थिनी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना या गणवेशांचा लाभ दिला जातो.

१०० टक्के विद्यार्थ्याना गणवेश मिळाले का याबाबतची माहिती विद्यार्थ्यांच्या नावानिशी मागवत आहोत. दुरध्वनीवरून सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता सर्व विद्यार्थ्याना गणवेश वाटप झाल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र विद्यार्थ्यांची यादी अजून मिळालेली नाही.
- दिलीप बघेले, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी
सर्वशिक्षा अभियान, गोंदिया.

गणवेशासाठी असा लागला निधी
तालुका निधी
अर्जुनी-मोरगाव३५,७३,४००
आमगाव ३३,२३,२००
देवरी २५,१२,६००
गोंदिया ९०,५९,०००
गोरेगाव ३३,८९,६००
सालेकसा २८,६७,२००
सडक-अर्जुनी२८,२४,४००
तिरोडा ५०,७६,२००
एकूण ३,२६,२५,६००

Web Title: 92,000 new uniforms for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.