९५ टक्के अत्याचार परिचितांकडूनच....! (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:54 AM2021-03-13T04:54:09+5:302021-03-13T04:54:09+5:30

गोंदिया : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सन २०१९ च्या तुलनेत सन २०२० या वर्षात ...

95% atrocities by acquaintances only ....! (Dummy) | ९५ टक्के अत्याचार परिचितांकडूनच....! (डमी)

९५ टक्के अत्याचार परिचितांकडूनच....! (डमी)

Next

गोंदिया : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सन २०१९ च्या तुलनेत सन २०२० या वर्षात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची परिस्थिती पाहता जिल्ह्यात ८२ गुन्ह्यांनी घट झाल्याचे दिसून येते. दरवर्षी गुन्ह्यांच्या टक्केवारीत वाढ होताना दिसते. विशेष म्हणजे, परिचित व्यक्तींकडूनच मुलींवर अत्याचार होतो.

सन २०२० मध्ये कारोनाने कहर माजविल्यामुळे एकट्या गोंदिया जिल्ह्यात २३ टक्के बलात्काराच्या घटना कमी घडल्या आहेत तर विनयभंगाच्या ४४ टक्के घटना कमी घडल्या आहेत. हुंडाबंदीच्या घटनांमध्ये ना वाढ ना घट दिसून आली आहे. हुंडाबंदीच्या घटनांवर कोरोनाचा काहीच फरक पडला नाही. गोंदिया जिल्ह्यात सन २०१९ मध्ये बलात्काराच्या ६५ घटना घडल्या होत्या तर सन २०२० मध्ये १५ गुन्ह्यांनी घट होऊन त्या ५० घटना घडल्या आहेत. सन २०१९ मध्ये विनयभंगाच्या १५१ घटना घडल्या होत्या तर सन २०२० मध्ये ६७ गुन्ह्यांनी घट होऊन त्या ८२ घटना घडल्या आहेत. सन २०१९ च्या तुलनेत सन २०२० मध्ये बलात्कार व विनयभंगाची प्रकरणे पाहता ८२ गुन्हे कमी घडले आहेत.

बॉक्स

लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शाेषण

मी तुझ्याशी लग्न करणार, असे मुलाकडून मुलीला आमिष दिले जाते. या आमिषाला मुलगी बळी पडून मुलासोबत आपल्या सुखी जीवनाचे स्वप्न रंगवत असते. परंतु हे स्वप्न लग्नाची वेळ येताच भंगलेले दिसते. नाईलाजाने मुलींना आपली फसवणूक झाल्याचे पाहून मुलांच्या विरोधात बलात्काराची तक्रार नोंदविली जाते. परिचित व्यक्तीकडूनच मुलींवर अत्याचार होत असतो.

बॉक्स

वर्षनिहाय आकडेवारी

सन २०१९ ----------सन २०२०

बलात्कार - ६५----------- ५०

विनयभंग-- १५१----------८४

हुंडाबळी------०२---------०२

...........

बलात्कारच्या घटना

परिचितांकडून - ४५

अपरिचितांकडून - ५

Web Title: 95% atrocities by acquaintances only ....! (Dummy)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.