९.८९ लाख क्ंिवटल धानाची भरडाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 09:33 PM2019-03-16T21:33:24+5:302019-03-16T21:35:04+5:30

यंदा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत १४ लाख ३० हजार ६३६ क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यातील ९ लाख ८९ हजार ३२१ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे. म्हणजेच आतापर्यंत ६७ टक्के धानाची भरडाई झाली असून यातून फेडरेशनला ६ लाख ६२ हजार ८४५ क्विंटल धान प्राप्त झाले आहे.

9.89 lakh crores was filled up | ९.८९ लाख क्ंिवटल धानाची भरडाई

९.८९ लाख क्ंिवटल धानाची भरडाई

Next
ठळक मुद्देमार्केटिंग फेडरेशनचे धान : ६.६२ लाख क्विंटल तांदूळ प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत १४ लाख ३० हजार ६३६ क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यातील ९ लाख ८९ हजार ३२१ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे. म्हणजेच आतापर्यंत ६७ टक्के धानाची भरडाई झाली असून यातून फेडरेशनला ६ लाख ६२ हजार ८४५ क्विंटल धान प्राप्त झाले आहे.
मागिल काही वर्षांत पावसाने दगा दिल्याने धानाच्या जिल्ह्यातच धानाचे उत्पादन घटत असल्याचे दिसत आहे. परिणामी धान उत्पादक संकटात अडकले होते. मात्र यंदा पावसाने साथ दिल्याने धानाचे चांगले उत्पादन झाले. हेच कारण आहे की, मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत १४ लाख ३० हजार ६३६ क्विंटल धान खरेदी केली आहे. खरेदी करण्यात आलेले धान पुढे भरडाईसाठी देऊन राईस मिलर्सकडून तांदूळ घेतले जाते. त्यानुसार, मार्केटिंग फेडरेशनकडून धान भरडाईसाठी देण्यात आले व आतापर्यंत ९ लाख ८९ हजार ३२१ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे. म्हणजेच, खरेदी करण्यात आलेल्या धानातील ६७ टक्के धानाची भरडाई करण्यात आली आहे.
यात, फेडरेशनला ६ लाख ६२ हजार ८४५ क्विंटल तांदूळ प्राप्त झाले आहे. लाख २ हजार ११३ तांदूळ प्राप्त झालेला आहे. विशेष म्हणजे, ही सध्याची परिस्थिती असून मार्चपर्यंत धान खरेदी केली जाणार असल्याने धान खरेदीची आकडेवारी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

१५३ राईस मिल्सचा करार
मार्केटींग फेडरेशनने खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी धान राईस मिलर्सला दिला जातो. यंदा १४ लाख ३० हजार ६३६ क्विंटल धान मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणाता धानाची खरेदी व आता त्याची भरडाई करणे सोपे काम नाही. त्यामुळे धानाची भरडाई करण्यासाठी यंदा १५३ राईस मिल्ससोबत करार करण्यात आला आहे. करार झालेल्या या राईस मिल्सना धान देऊन आता त्यांच्याकडून धानाची भरडाई केली जाईल.

Web Title: 9.89 lakh crores was filled up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.