लग्नाला गेलेल्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार, दगडाने ठेचून हत्या

By नरेश रहिले | Published: April 20, 2024 08:41 PM2024-04-20T20:41:46+5:302024-04-20T20:42:34+5:30

ककोडी परसरातील ग्रामपंचायत गोठणपार येथे १९ एप्रिल रोजी लग्नकार्यात घरातील सर्व मंडळी गेले. त्या लग्नाला काजल १२ ही देखील गेली.

A 12-year-old married girl was raped and stoned to death | लग्नाला गेलेल्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार, दगडाने ठेचून हत्या

प्रतिकात्मक फोटो...

गोंदिया: कुटुंबासह गावातीलच लग्न समारंभात गेलेल्या १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर नराधमाने तिला दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला. ही घटना १९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास देवरी तालुक्याच्या ककोडी परसिरातील वटेकसा येथील जंगलात घडली. काजल (१२) (बदललेले नाव) रा. गोठणपार असे मृत मुलीचे नाव आहे.

ककोडी परसरातील ग्रामपंचायत गोठणपार येथे १९ एप्रिल रोजी लग्नकार्यात घरातील सर्व मंडळी गेले. त्या लग्नाला काजल १२ ही देखील गेली. लग्न समारंभात ती असतांना अज्ञात आरोपीने तिचे अपहरण करून रात्री ८ वाजताच्या सुमारास वटेकसा येथील जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यांतर तिला दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला. ही घटना २० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे अवघा गोंदिया जिल्हा हादरला आहे.

अर्जुनी- -मोरगाव तालुक्यातील भसबोळन येथील नरेश तितराम यांचा मुलगा राकेश उर्फ रॉकी याचे देवरी तालुक्यातील गोठनपार येथील कुरूसिंग पडोटी यांची मुलगी हेमलता उर्फ लता हिच्यासोबत १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता लग्न समारोह होता. या लग्नसमारंभासाठी पिडीत मुलगी आपल्या कुटुंबियासह आली होती. परंतु नराधमाने संधीचा फायदा पाहून तिचे अपहरण करून त्या चिमुकलीवर अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला. या घटनेसंदर्भात चिचगड पोलिसांनी तिच्या वडीलाच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३०२, ३७६, ३६३ सहकलम ४, ६ बाललैंगीक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासासाठी चमू रवाना
या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी चिचगड येथील ठाणेदार काळेल व त्यांची चमू कामाला लागली आहे. प्रकरण तापू नये म्हणून आरोपींना अटक करण्यासाठी तपासाची सुत्रे पोलिसांनी चालविली आहेत.

दोषींना अटक करून फाशी द्या
निरागस मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमाणूस कृत्य करीत तिचा जीव घेणाऱ्या नराधमाला त्वरीत अटक करा, या प्रकरणातील दोषीला फाशी देण्यात यावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.

लोकशाहीच्या आनंदावर लगेच पडले विरजन
लोकशाही मजबूत करण्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान करण्यात आले. उमेद्वारांनी महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षेचे वचन देत मत मागितले. परंतु मतदानाचे कार्य होताच १२ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून करण्याचे अमाणूस कृत्य करण्यात आले. या संतापजनक घटनेमुळे गोंदिया जिल्हा हादरला आहे. मुलीच्या सुरक्षेचा आणि संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 

Web Title: A 12-year-old married girl was raped and stoned to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.