कर्जबाजारीपणामुळे 60 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची राहत्या घरातच आत्महत्या

By अंकुश गुंडावार | Published: September 1, 2022 07:11 PM2022-09-01T19:11:55+5:302022-09-01T19:17:56+5:30

मुलगा आपल्या पत्नीसोबत पुण्याला कंपनीत कामाला आहे. ११ वाजता दरम्यान त्याची पत्नी घराचे बाजुला असलेल्या शेतात निंदन करायला गेली होती

A 60-year-old farmer committed suicide in his residence due to indebtedness in gondia | कर्जबाजारीपणामुळे 60 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची राहत्या घरातच आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे 60 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची राहत्या घरातच आत्महत्या

Next

अंकुश गुंडावार

सडक अर्जुनी (गोंदिया): तालुक्यातील कनेरी/मनेरी येथील शेतकरी गिरीधारी  सखाराम भेंडारकर वय ६० वर्ष यांनी आज दुपारी १२.३० वाजता दरम्यान राहत्या घरी कुणीच नसतांना गळफास लावून आत्महत्या केली. कर्जापायी व रब्बी हंगामातील धान विक्री न झाल्याने  गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजते. मृत्यू पश्चात पत्नी चंद्रभागा, एक मुलगा व तीन विवाहित मुली आहेत.

मुलगा आपल्या पत्नीसोबत पुण्याला कंपनीत कामाला आहे. ११ वाजता दरम्यान त्याची पत्नी घराचे बाजुला असलेल्या शेतात निंदन करायला गेली होती. आणि नातु शेतात खत मारायला गेला होता. नातू विशाल माधो तरोणे खत मारुन घरी परत आला असता तर आजोबा घरी गळफास ला्वलेल्या स्थितीत आढळले. त्याने घराजवळील लोकांना बोलावून घटनेची माहिती दिली ‌. या घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशन डुग्गीपारचे बीट जमादार गावड घटनास्थळी दाखल झाले. व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Web Title: A 60-year-old farmer committed suicide in his residence due to indebtedness in gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.