चिलीम ओढणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल, तीन पोलिस ठाण्यांची कारवाई
By नरेश रहिले | Published: August 21, 2023 02:44 PM2023-08-21T14:44:29+5:302023-08-21T14:45:00+5:30
मादक पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
गोंदिया : गांजाची नशा करणाऱ्यां विरोधात २० ऑगस्ट रोजी जिल्हाभरात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत तीन पोलिस ठाण्यांतर्गत ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गोंदिया शहर, रामनगर व डुग्गीपार या तीन पोलिस ठाण्यांतर्गत ११ चिलिम ओढणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या साराम बापू आश्रमजवळ चिलिम पिणाऱ्या धरमवीर उर्फ बिट्टू पप्पीसिंग बल (२१) रा. शिवाजीनगर गोंदिया याला गोंदिया शहर पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार सुदेश टेंभरे यांनी २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता पकडले. दुसरी कारवाई पोलीस हवालदार जागेश्वर उईके यांनी सायंकाळी ७ वाजता मोक्षधाम समोरील रस्त्यावर करण्यात आली. फुलचूरच्या विठ्ठल चौक वाॅर्ड क्रमांक एक येथील अमित महेश मस्करे (२२) हा चिलीम पित असतांना त्याला पकडले. तिसरी कारवाई गड्डाटोली येथील रेल्वे इलेक्ट्रिशियन ऑफिस जवळ पोलिस हवालदार छत्रपाल यांनी केली आहे.
आरोपी अल्ताफ मीरअली सय्यद (२२) रा. शारदा मंदिराच्या जवळ सावराटोली, बॉबी प्रवीण चव्हाण (२८) रा. गल्ली नंबर ३ गौरीनगर राजनांदगाव हल्ली मुक्काम नुरी मज्जित मागे गोविंदपुर गोंदिया व विशाल मधुकर शहारे (३०) रा. मोठा हनुमान मंदिर हे तिघेही चिलम पित असताना त्यांना पकडले. चवथ्या कारवाईत रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जे.एम.शाळेच्या मागील पटांगणावर चिलिम पिणाऱ्या तिघांवर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी अरविंद सुरेश कागदे (२६) रा. पुनाटोली गोंदिया, रोशन नारायण भोयर (२४) कन्हारटोली व कृणाल बाबुलाल रंगारी (२८) रा. नर्मदा मंदिर या तिघांना चिलीम पितांना पोलिस हवालदार राजेश भुरे यांनी पकडले. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कवलेवाडा येथील शिवारात आरोपी हिमांशू गणराज बोरकर (२७), अनिकेत प्रभुराज बडोले (२४) रा. कोदामेडी व प्रतीक गजानन गजभिये (२३) रा. सडक-अर्जुनी हे तिघेही कवलेवाडा शिवार परिसरात चिलिम पित असताना त्यांना पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस शिपाई सुनील डहाके, नायक पोलीस शिपाई महेंद्र चौधरी व पोलीस हवालदार झुमनलाल वाढई यांनी केली आहे. या सर्व प्रकरणातील ११ आरोपींवर संबधीत पोलिस ठाण्यात मादक पदार्थ विरोधी कायदा कलम २७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.